BJP : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघात दोन उमेदवारात सरळ लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे गट लढवणार आहे.
ठाकरे गटाने या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या सोबत सहानभुतीची लाट पण असणार आहे. सोबतच त्यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे पाठबळ असणार आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवताना जास्त अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पण ते पहिल्या पासून भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते. त्यामुळे त्यांचा भाजपातील कार्यकर्त्यांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून विरोध होत आहे. सोबतच मुरजी पटेल यांचा गुजराती असणे हा देखील एक मुद्दा आहे.
मुरजी पटेल यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकली असता. ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी २०१५ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्याच्या आधी त्यांची पत्नी २०१२ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या होत्या. पण त्यानंतर दोघांनीही कॉंग्रेसला राम राम ठोकला.
त्यानंतर २०१७ च्या महानगर पालिका निवडणुकीत दोघेही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक झाले. पण त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट आढळून आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर २०१९ मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
त्यांच्या याचं ‘आया राम गया राम’ व्रतीमुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते त्यांच्यावर नाराज आहेत. आता या नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजापाचे वरिष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. आता हे वरिष्ठ नेते नाराज मंडळीना शांत करतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde Group : “शिंदे गटाला RSS च्या बाळासाहेब देवरसांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला”
Dipak Kesarkar : दिपक केसरकर बाजारबुणगे, हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही, मंत्रीपदाचे गाजर दिसताच…
Mulayam Singh Yadav : फक्त राजकीय वारसाच नाही तर प्रचंड मोठी संपत्ती मागे ठेवून गेलेत मुलायमसिंग; आकडा ऐकून डोळे फिरतील