सनी देओल हे बॉलीवूडचे सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांचे वडील म्हणजेच अभिनेते धर्मेंद्रप्रमाणे उत्साहाने आणि धैर्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. घायल, घातक आणि दामिनी राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली सनी देओलने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये सनी देओलचा वेगळाच अंदाजात दिसला.(Before shooting the scene, Sunny Deol had sent this message to Amrish Puri,
घातक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट तर ठरलाच पण अनेक प्रकारच्या प्रशंसा आणि अनेक पुरस्कारही जिंकले. 1996 साली प्रदर्शित झालेला घातक हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटात अशी अनेक दृश्ये होती जी कोणालाही भावूक करतात. घातकमध्ये सनी देओलसोबत अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री दिसले होते.
नुकतेच सनी देओलने चित्रपटाशी संबंधित एका सीनची आठवण मिडियासमोर काढली होती. एका बॉलीवूड रिपोर्टशी संबंधित एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सनीला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘घातक तुमचा सर्वात अप्रतिम चित्रपट आहे. तुम्ही तो कसा शूट केला आहे त्याचा एखादा सीन आठवतोय का?’ सनी देओल उत्तरतो, ‘अनेक शॉट्स पुन्हा पुन्हा रिपीट झाले. पण माझी आणि राजकुमार संतोषी यांच्यात अशी केमिस्ट्री आहे ज्यामुळे अनेक सीन रिशूट करणे खूप अवघड होते.
सनी देओल म्हणतात की, ‘एक सीन होता ज्यामध्ये मी माझ्या वडिलांना सांगतो की तुम्हाला कॅन्सर आहे. अमरीश पुरीजी माझ्यासोबत होते. मी डायरेक्टर साहेबांना म्हणालो की तुम्ही जाऊन अमरीशजींना सांगा की मी पुढील सीन कसे काय करणार आहे हे मला माहीत नाही. कारण तो खूपच भावूक सीन होता. त्यावेळी मला काय वाटले ते माहित नाही. मग मी ते पात्र इतकं साकारलं की मी खरंच काशी झालो होतो.
सनी पुढे सांगतात, आम्ही जेव्हा सीन शूट करायला सुरुवात केली तेव्हा तो सीन असा झाला की तो संपल्यानंतरही सेटवर उपस्थित असलेले सगळेच रडत होते. राजकुमार संतोषी आणि माझी बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत होती, असे अनेक प्रसंग अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. तो माझ बोलणं मानायचा पण आणि ऐकूनही घ्यायचा.
सनी देओल आणि राजकुमार संतोषी या सुपरहिट जोडीने घायलसारखे चित्रपटही दिले आहेत. नंतरच्या काळात एका चित्रपटावरूनही दोघांच्या नात्यात दुरावा आला. पण बॉलिवूड करिअरमध्ये सनी देओलने राजकुमार संतोषीबद्दल कधीही अपशब्द बोलले नाही. मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, एकदा धर्मेंद्र यांची नाराजी नक्कीच समोर आली होती.
धर्मेंद्र यांनी एकदा असेही म्हटले होते की, राजकुमारचा घायल चित्रपट प्रोड्यूस करायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळेच आम्ही राजकुमार संतोषीसारखे दिग्दर्शक घडवले आहेत. या अनुषंगाने एकदा राजकुमार संतोषी यांनाही सनीसोबतच्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, जर मला चांगली कथा मिळाली तर मला नक्कीच त्याच्यासोबत चित्रपट करायला आवडेल.
महत्वाच्या बातम्या-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले
चॅलेंज! या फोटोतील बिबट्या शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल
आम्हाला काहीच नको फक्त येथून बाहेर काढा, पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील विद्यार्थ्याने सांगितली आपबीती
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस