Share

लग्नाला पोहोचायच्या आधीच मृत्यूने गाठलं, वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात, चौघांचा मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात होऊन चार जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. अपघाताने संबंधित परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबादहुन नाशिककडे लग्नसमारंभासाठी वऱ्हाडाची गाडी जात असताना, औरंगाबाद-लासुररोडवर गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीत असणारे चार जण जागीच ठार झाले असून, काहीजणांवर उपचार सुरू आहेत. लग्नाचं वऱ्हाड नेणारी गाडी ‘आयशर’ होती. यामध्ये एकूण 35 लोकं होती.

औरंगाबादहुन नाशिककडे जाताना शिवराई गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या दुसऱ्या आयशरचा आणि या आयशरचा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. गाडीमधील 22 जण जखमी असून, त्यांच्यावर वैजापूर आणि औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे तीन च्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 22 जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले होते. यातील किरकोळ जखमी असणाऱ्या रुग्णांवर वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर, गंभीर जखमी रुग्णांना औरंगाबाद च्या घाटीत हलवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनातून वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात 22  जण जखमी तर 4 जण जागीच मृत्यूमुखी झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली आहे.

जखमींपैकी 4 जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. भीषण अपघाताने गाडीचेही प्रचंड नुकसान झाले. या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now