Share

अडीच हजार वर्षापुर्वी देशातील सगळे हिंदू बौद्धच होते, ते नंतर हिंदू झाले, मुस्लिम देखील…

ramdas athawale

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत येतात. अनेकदा त्यांनी रचलेल्या कविता लक्षवेधून घेतात. हे सांगण्याच कारण म्हणजे रामदास आठवले पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. आता त्यांनी एक अजब दावा केला आहे.

ते म्हणतात, ‘अडीच हजार वर्षांपूर्वी सर्व बौद्ध होते. नंतर देशात हिंदू धर्म येऊन लोक हिंदू झाले. हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण करू नका. देशातील मुसलमानही बाहेरून आलेले नाहीत. तेही आधी हिंदू आणि तत्पूर्वी बौद्ध होते, असा अजब दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

याबाबत नाशिकमध्ये बोलताना त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी सगळेच बौद्ध होते असा दावा केला आहे. आठवले म्हणतात, ‘सर्वांत आधी जगात बौद्ध धर्म होता त्यानंतर हिंदू आला, त्यानंतर मुस्लीम असं करत सर्व धर्म तयार झाले. बौद्ध हा सर्वांत जुना धर्म आहे. मुस्लीम धर्म हा सुद्धा हिंदू धर्मापासून तयार झाला आहे.’

सध्या राज्यात भोंग्यावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. याच मुद्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तर दुसरीकडे याच मुद्याचा आधार धरून रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेली भूमिका योग्य नाही असं ते म्हणाले आहेत.

याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंनी कधीही भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली नाही. राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल घातली आहे, तर चांगली गोष्ट आहे. कारण, भगवा हे शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंग हा भगवाच होता. भगवा रंग हा वाद लावण्याचा प्रतीक अजिबात नाही.’

दरम्यान, तर दुसरीकडे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका खासदाराने राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ‘राज यांच्या अयोध्या जाण्याला विरोध नाही, पण उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी,’ असं आठवले यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाग-नागिणीची प्रेमकहाणी, नागिणीच्या मृत्युनंतर नाग तिच्याजवळच बसला फणा उभारून
सामाजिक बंधने झुगारत बुलढाण्याच्या पठ्ठ्याने ठेवला नवा आदर्श, विधवा भावजयीसोबत केलं लग्न
चेन्नईचा ९७ धावांत उडवला खुर्दा; धडाकेबाज विजय मिळवत मुंबई इंडीयन्सने बदला घेतला
आंदोलन पेटलं! ‘या’ १० राज्यांनी राज ठाकरेंवर लावली बंदी; माफी मागितल्याशिवाय मिळणार नाही प्रवेश

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now