विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात एक वेगळी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेकदा मधमाश्यांनी हल्ल्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या हल्ल्यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक बातमी पुण्यातून समोर आली आहे.
भटकंतीला गेलेल्या काही तरूणांवर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. या घटणेने तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, मधमाश्यांच्या हल्ल्यात काही तरुण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर दुखापतग्रस्त तरुण-तरुणींना उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तर जाणून घेऊया नेमका हल्ला कसा झाला? या तरूणांकडून कोणती चूक झाली? ही घटना पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळा परिसरातील कातळदरा येथे घडली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस ठरवून पुण्यातील आयटी कंपनीतील एक तरुणांचा ग्रुप भटकंतीसाठी गेला होता.
भोसरी येथील अकरा जणांचा हा ग्रुप भटकंती करण्यास गेला असल्याची माहिती मिळत आहे. भटकंती करताना तरुणांनी धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचल्याचं बोललं जात आहे. यामुळेच मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे अकरा यापैकी सात जणांवर मधमाशांनी हल्ला चढवला. मधमाशांनी हल्ला चढवल्यावर तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटना स्थळावरून तरुणांनी धावाधाव सुरू केली. या हल्ल्यात सात जणांना दुखापत झाल्याचे समजत आहे.
घटनास्थळी जाऊन शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीवन रक्षक संस्था यांनी तात्काळ या तरुणांना मदत केली. जखमी तरुण-तरुणींवर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे. सध्या या हल्ल्याने तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
झुंड चित्रपटासाठी ‘भावना भाभी’ची निवड कशी झाली? वाचा तिनेच सांगीतलेला भन्नाट किस्सा
यशवंत जाधवांनी आईवरच फाडलं बिल? ‘मातोश्री’ला दोन कोटींचे गिफ्ट देण्याबाबत डायरीतून झाला मोठा खुलासा
विरोधकांवर डळकाळी फोडणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ झाला शांत; ट्विट करुन स्पष्टच सांगितलं
नो VIP ट्रीटमेंट! वयाच्या ८१ व्या वर्षीही शरद पवार विमानतळावर सर्वसामान्यांच्या रांगेत; फोटो व्हायरल