beed Pandurang chavhan death | बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाचा लग्नाच्या अवघ्या २१ दिवसानंतर मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिथल्या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.
संबंधित घटना ही गेवराईमध्ये घडली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव पांडुरंग चव्हाण असे आहे. तो २२ वर्षांचा असून त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे पांडूरंग चव्हाण राहत होता. या २२ वर्षीय तरुणाचा २१ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. पण एकदिवशी रात्री त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे.
आता पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. पांडूरंगचा मृत्यू नक्की कशामुळे झाला आहे हे अजूनही समोर आलेले नाही. त्याचे शवविच्छेदन होणार असून त्यानंतर त्याबाबत माहिती मिळणार आहे. सध्या पोलिसांनी तरुणीला अटक केलेली असून तिची चौकशी केली जात आहे.
पांडूरंग हा खुप मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्यामुळे संपुर्ण परिसरामध्ये त्याचे चांगले संबंध होते. फक्त २१ दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्याच्यानंतर काहीच दिवसात पांडूरंगचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पांडूरंगच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याच्या पत्नीवरच संशय घेतला आहे. तसेच त्याला हृदयविकाराचा झटका आला नसून त्याच्या पत्नीनेच त्याचा जीव घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोलिसांनी अजून त्या तरुणीवर गुन्हा दाखल केलेला नसून पोलिस शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंरच पुढील पाऊल उचलणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
sushma andhare : अंधारे महीला आयोगाच्या कार्यपद्धतीवर भडकल्या! म्हणाल्या प्रेमपत्र दिल्यागत नोटीसा काढू नका
धीरुभाई अंबानींच्या ‘त्या’ घोडचुकीमुळे दोन्ही भाऊ वैरी झाले, कोणती चूक नडली? जाणून घ्या…
भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी संघात मोठा बदल; ‘या’ धडाकेबाज खेळाडूची झाली संघात एन्ट्री