Share

..त्यामुळे राकेश झुनझुनवालांना झाले होते अनेक गंभीर आजार, स्वतःच सांगितले होते कारण

शेअर मार्केटचे किंग राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयुष्यात आलेली विविध संकटे परतवून लावणाऱ्या झुनझुनवाला यांचा जगण्यासाठीचा संघर्ष अखेरीस संपला. त्यांना आरोग्याच्या अनेक व्याधी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. ( Rakesh Jhunjhunwala suffered from many serious diseases)

राकेश झुनझुनवालांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र पावणे सातच्या सुमारास ६२ वर्षीय राकेश झुनझुनवालांची प्राणज्योत मालवली.

खरंतर किडनी विकाराने ग्रस्त राकेश झुनझुनवाला यांना दोन- तीन आठवडड्यांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराअंती त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यादरम्यान त्यांनी एक मुलाखत दिली. त्यामध्ये राकेश झुनझुनवाला यांचं अतिशय घटलेलं वजन, खोल गेलेला आवाज यावरूनच त्यांची प्रकृती खालावली असल्याचे स्पष्ट दिसत होते.

‘कोविड काळात अंथरुणात खिळून असल्याने माझ्या वजनात मोठी घट झाली आहे. या काळात मला प्रचंड शारीरिक त्रास झाला’ या शब्दात राकेश झुनझुनवालांनी आपल्या आरोग्यासंबंधी भाष्य केले होते.

काहीच दिवसांपूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा एअरलाइन्सच्या माध्यमातून हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला. बुद्धिमत्ता, चातुर्य आणि कठोर मेहनतीच्या जोरावर इंडियाचा वॉरन बफे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी आहे. राकेश झुनझुनवालांच्या जाण्याने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
विनायक मेटे अपघात प्रकरणात पोलिसांनी ‘या’ व्यक्तीला घेतले ताब्यात, चौकशीतुन अपघाताचे कारण येणार समोर
सरकारवर दबाव टाकायचा असेल तर.., दु:ख व्यक्त करताना संभाजीराजे सरकारवर बरसले
विनायक मेटेंचा घातपात की अपघात? मराठा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक, केली चौकशीची मागणी

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now