Share

Shinde group: …यामुळे अंधेरी विधानसभेची जागा शिंदे गटाने भाजपला सोडली; राजकीय वर्तुळात चर्चा

नुकतेच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिवसेना नगरसेवक रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.

शिवसेना नगरसेवक रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघावर साहजिकच शिवसैनिकाचा दावा असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशा परिस्थितीत शिंदे गट या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र, आता शिंदे गटाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सर्वांचेच डोळे वर झाले आहेत. शिंदे गटाने ही जागा स्वतः न लढवता सहजासहजी भाजपच्या मुरजी पटेल यांना सोडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, ही जागा भाजपच लढवेल असं निश्चित मानलं जात आहे.

आता इतक्या मोठ्या बंडानंतर शिंदे गटाने मुंबईत शिवसेनेशी थेट दोन हात करण्याची संधी का सोडली, आणि भाजपला जागा का दिली असा प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे. याचे खरे कारण आता समोर आले आहे.

पहिले कारण म्हणजे सध्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर हक्क सांगितला जात असला तरी अधिकृतरित्या त्यांना पक्षाचा ताबा मिळालेला नाही. आजही शिवसेना पक्षाचा अधिकृत AB Form देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच अबाधित आहे.

तसेच दुसरं कारण म्हणजे, शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची म्हटली तरी त्यांच्याकडे कोणतेही पक्षचिन्ह नाही. त्यामुळे ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे ठासून सांगणाऱ्या शिंदे गटाला भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now