Swapnil Joshi: मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशीवर प्रेक्षकांची नाराजी असल्याची गोष्ट समोर येत आहे. स्वप्निल जोशी तर कायमच प्रेमाला वाहून घेतलेल्या त्याच्या सिनेमांनी तसेच भन्नाट कॉमेडी असणाऱ्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. मग का बरं स्वप्निल जोशीवर चाहते नाराज झाले, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना? जाणून घेऊया
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड बॉयकॉट हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे. त्यामुळे अनेक हिंदी चित्रपट कलाकारांना युजर्सच्या रागाला सामोरे जावे लागत आहे. तसेच बॉलीवूड कलाकारांचे समर्थन करणाऱ्या इतर इंडस्ट्रीतील कलाकारांवर सुद्धा प्रेक्षक भडकल्याचे पाहायला मिळते. त्याचमुळे स्वप्निलवर पण प्रेक्षक नाराज आहेत.
स्वप्निलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बॉलीवूड कलाकार रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर सोबतचा एक फोटो शेअर केला. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन देत स्वप्निलने म्हंटले होते, “सोपी, वास्तविक, जादुई… तुम्ही लोक जी कोण आहात. त्याच कारण फक्त तुम्हीच आहात..”
पुढे कॅप्शनमध्ये स्वप्निल जोशीने खऱ्या ‘अर्थाने तुम्ही सुपरस्टार’, असं लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे प्रेक्षकांनी स्वप्नील जोशीला चांगलेच ट्रोल केले. अनेक कमेंट्स करत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. एकाने व्यक्तीने म्हंटले, स्वप्निल तुला पण बॉयकॉट व्हायचे आहे का? तर दुसरा म्हणाला, मी आजपासून स्वप्निल जोशीचा एकही चित्रपट बघणार नाही.
स्वप्निल जोशी मराठी इंडस्ट्रीचा मोठा अभिनेता आहे. मात्र त्याने बालवयापासून हिंदी इंडस्ट्रीत पण काम केले आहे. रामानंद सागर यांच्या सुप्रसिद्ध रामायणात त्याची भूमिका होती. पुढे रामानंद सागरनिर्मित “श्रीकृष्ण” या सिरीयलमध्ये कृष्णाच्या मुख्य भूमिकेत स्वप्निलला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
दरम्यान सध्या सोशल मीडियावर “बॉलीवूड बॉयकॉट” हा जो ट्रेंड चालू आहे. त्याचा फटका अनेक हिंदी कलाकारांच्या चित्रपटांना बसला. आमिर खानचा लालसिंग चड्डा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन, तापसी पन्नूचा दोबारा या चित्रपटांना प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरून बॉयकॉटचे प्रकरण चांगले तापल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
Cricket : आशिया चषकात रंगणार भारत – पाकीस्तान महामुकाबला; ‘असा’ पाहता येईल मोबाईलवर LIVE
Congress President : ‘सोनिया गांधीच सांभाळणार २०२४ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्षपद’, सर्व नेत्यांनी चर्चेमध्ये केली ‘ही’ मागणी
J.P. Nadda: पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता, भाजपचा खळबळजनक आरोप