दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्री वरचा एक किस्सा सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाले, आनंद दिघे हे ‘झुकेंगा नही साला’ असेच होते.
हिम्मत असेल तर समोर या, हिम्मत असेल तर टक्कर दे असे आनंद दिघे होते. असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आनंद दिघे होते, त्यांचा माणूस आणि शिवसैनिक पुन्हा होणे नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी आनंद दिघे यांच्याबाबत बोलत होते.
यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यामधील एक किस्सा सांगून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाले, आनंद दिघे यांचं नाव घेतल्यावर सगळे दिवस आठवत आहे. बाळासाहेब हे आनंद दिघे यांच्यावर वेळेबाबत नेहमी रागवत असायचे.
बाळासाहेब हे वेळ पाळणारे होते. मात्र, आनंद दिघे यांना सकाळी 11 ची वेळ दिली असेल तर 2 वाजेपर्यंत त्यांचा काही पत्ता नसायचा. मग 2 वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. यामुळे बाळासाहेब आनंद दिघे यांच्यावर सतत रागवायचे. बाळासाहेबांसमोर उभे असल्यावर एका शब्दाने ते बोलायचे नाही. समोर आल्यानंतर राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहण्यास मिळालं असा हा त्यांच्यातील गंमतीशीर भाग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांवर देखील निशाणा साधला. म्हणाले, चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिष्य असं हे नातं जपणारा हा एकमेव पक्ष असणार आहे. ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली. असे ठाकरे म्हणाले.