Share

मोहसिन खानमुळे ‘या’ स्टार खेळाडूला भारतीय संघात मिळालं नाही स्थान, करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला स्थान मिळालेले नाही. आयपीएल-2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या टी नटराजनने या हंगामात चांगली गोलंदाजी केली. त्याने 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या.

या कामगिरीनंतरही नटराजनला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. याचे सगळ्यात मोठे कारण मानले जात आहे की त्याला बाकीच्या गोलंदाजांकडून तगडे चॅलेंज भेटत आहे. सध्या असे अनेक गोलंदाज आहेत जे चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामुळे टी नटराजनसारखा गोलंदाज संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे.

झहीर खान, आशिष नेहरा आणि इरफान पठाण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ डावखुरा वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. निवडकर्त्यांच्या नजरा टी नटराजनवरही लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संधी मिळाली. नटराजन यांनीही निवडकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या.

मात्र तेव्हापासून तो दुखापतीशी झुंजत आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी टी नटराजनला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागली पण तरीही त्याच्या हाती निराशाच आली. त्याला मोहसीन खान हा गोलंदाज आव्हान देत आहे. संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या नटराजनच्या अडचणी आता वाढणार आहेत.

कारण त्याला आता डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानकडून आव्हान मिळणार आहे. मोहसीन आयपीएल-2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळत आहे. त्याचे हे पहिलेच आयपीएल असून त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. मोहसीन खानने या आयपीएलमध्ये 8 सामने खेळले असून 13 विकेट्स घेतल्या आहेत.

तो लखनौच्या संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मोहसिन खानला लखनऊने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्याने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता पुढील आयपीएल लिलावात त्याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे. या सगळ्या कारणांचा टी नटराजनला फटका बसला आहे. टी नटराजन सारखे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना उत्तम कामगिरी करूनही भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

महत्वाच्या बातम्या
गरिबीत गेले बालपण, सिग्नलवर विकले साबण, मग डॉक्टर बनून ३७ हजार मुलांची केली फ्री शस्त्रक्रिया
बिकीनीतील हॉट फोटोंनी घायाळ करणारी अप्सरा आहे सुगरण; सासरी पहिल्यांदाच बनवला गोड पदार्थ
‘या’ कारणामुळे संभाजीराजे राजेंनी राज्यसभेच्या रिंगणातून घेतली माघार;राजकीय समीकरण बदलणार?
पायलटने विमान हवेत असतानाच महिलेसोबत सुरू केला से’क्स, पुढे घडले असे काही की..व्हायरल व्हिडिओने खळबळ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now