Share

सावधान! ‘द काश्मीर फाईल्स’ विनामूल्य पाहण्याच्या नादात लोकांना बसला 30 लाखांचा गंडा

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या बॉक्सऑफीस वरती धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. याचा फायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहेत. याविषयी नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त, रणविजय सिंह यांनी मोबाईल वापरकर्त्यांना ‘द काश्मीर फाईल्स’ शी संबंधित या ‘व्हॉट्अँप स्कॅम’ बद्दल चेतावणी दिली आहे.

चित्रपटाच्या सत्यतेबद्दल खात्री होईपर्यंत त्यांनी वापरकर्त्यांना चित्रपटाच्या नावावर असलेल्या व्हॉट्अँपवर आढळलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असे सांगितले आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या काही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची एखादी लिंक तुमच्या व्हॉट्सअँप वर आल्यास त्या लिंकवर लगेच क्लिक करु नका. ती लिंक चित्रपटाचीच आहे का याची खाची करुनच क्लिक करा. अशा पध्दतीच्या लिंकवर क्लिक करुन फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एखाद्या व्यक्तीने व्हॉट्अँपवर प्राप्त केलेल्या या लिंकवर क्लिक करताच, फसवणूक करणाऱ्यांना वापरकर्त्याच्या फोनची माहिती मिळते आणि ते सहजपणे वैयक्तिक माहिती चोरतात. रणविजय सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

सर्वप्रथम, फसवणूक करणारे लोक व्हॉट्अँपवर लिंक पाठवतात आणि या लिंकसोबत एक मेसेज असतो ज्यामध्ये म्हटले आहे की लोक लिंकवर क्लिक करून काश्मीर फाईल्स चित्रपट विनामूल्य डाउनलोड करू शकतात. कोणताही वापरकर्ता लिंकवर क्लिक करताच, सर्व माहिती सायबर गुन्हेगाराला मिळते.

रणविजय सिंह यांनी सांगितले की, 24 तासांत तीन लोक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि सर्वांनी ‘सायबर फ्रॉड’ ची तक्रार दाखल केली, तिन्ही लोकांच्या तक्रारी सारख्याच होत्या. तिन्ही लोकांची फसवणूक ही ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट विनामूल्य पाहण्याच्या उत्सुतेत झाली. यात तिन्ही लोकांचे एकूण 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now