Share

‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा’; अजित पवार यांचा शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. असे असताना मुख्यमंत्र्यांकडून आज ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रविवारी दोन्ही पक्षांच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांच्या जेवणावळी उठवत आहेत. हे बरोबर नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असे म्हणत अजित पावर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर हल्लाबोल केला.

म्हणाले, राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करता या स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे. राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं असताना इथे आमदारांचे स्नेहभोजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच म्हणाले, आपण राज्यघटनेला मानून पुढे जातो, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत. देशात कायद्याचं राज्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली आहे. मात्र या ठिकाणी लोकशाहीची थट्टा लावली आहे, लोकशाहीचा खून पाडला जातो आहे.

अजित पवार म्हणाले, आज आपलं सरकार नाही, आपण विरोधी पक्षात आहे आणि आपली ताकद कमी आहे. शिंदे आणि फडणवीस अजून मंत्रिमंडळ स्थापन करत नाहीत, अरे बाकीच्यांना घ्या ना, ४२-४३ जणांचं मंत्रिमंडळ करता येतं. मी स्पष्ट बोलतो पण दुजाभाव केव्हा केला नाही.

या सरकारचा निर्णय बघा, सदस्य एका विचाराचा आणि सरपंच वेगळ्या विचाराचा, दोघं कसं काम करणार? अडचणी येतात. राष्ट्रपतीची निवडणूक आहे आता आमदार, खासदार मतदान करतात, देशातील जनता या निवडणुकीला मतदान करते का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now