भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगने अप्रतिम खेळ दाखवला. पण एकेवेळी बांगलादेशचा संघ सामन्यात आघाडीवर होता. त्यानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार 17 धावांनी पुढे होता, पण पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना जिंकला. Virat Kohli, Arshdeep Singh, Bangladesh, Pakistan, Shahid Afridi,BCCI
यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही टीम इंडियावर मोठा आरोप केला. यावर आता बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, आयसीसीला कोणत्याही किंमतीत भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवायचे आहे. ओले मैदान असूनही बांगलादेशसोबतचा सामना पावसानंतर आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला, भारत खेळत असताना आयसीसीवर दबाव असतो. त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. एकूणच बांगलादेश चांगला खेळला. तसेच बांगलादेश सामन्यात पंचांनी दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना करण्याचा निर्णय घेतला होता.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, आयसीसीकडून भारतीय संघाची बाजू घेतल्याचा आरोप योग्य नाही, सर्वांना समान वागणूक दिली जाते. इतर संघांपेक्षा आम्हाला काय वेगळे मिळते? भारत हे क्रिकेटमधील पॉवरहाऊस आहे पण आयसीसी आमच्याशी इतर कोणत्याही संघाप्रमाणे व्यवहार ठेवते.
2023 चा आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे, पण टीम इंडिया तिथे जाण्याबाबत अजूनही साशंकता आहे. यावर बोलताना बीसीसीआय प्रमुख म्हणाले, हे बीसीसीआयच्या हातात नाही. हे सरकारला ठरवावे लागेल. शासनाच्या मान्यतेने सर्व कामे केली जातील.
2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. भारताकडे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या-
Jasmin Dhunna : …तर कॅमेऱ्यासमोर मी सगळे कपडे काढायला सुद्धा तयार; प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य
bjp : ‘…तर मी राजकारणातून संन्यास घेईन,’ भाजप खासदाराच्या वक्तव्याने पक्षश्रेष्ठींना फुटला घाम
shivsena : ‘फडणवीस हुशार, हे सरकार पडणार म्हणून त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडून तयार ठेवलेत’