आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयपीएलसाठी आपल्या कॅलेंडरमध्ये अडीच महिन्यांचा कालावधी देणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बीसीसीआय आणि फ्रँचायझी आयपीएल संघांनी परदेशात जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळवण्याच्या योजनेवरही काम करत आहेत. (BCCI jai shaha on ipl)
आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून संघांची संख्या ८ वरून १० करण्यात आली. गुजरात टायटन्स आणि लखनऊ जायंट्स यांनी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यामुळे सामन्यांची संख्याही वाढली आहे. यावेळी आयपीएलचे सामने २ महिने खेळवले गेले.
तसेच आयपीएलदरम्यान अनेक खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे आयपीएल सोडून गेले होते. आयपीएल सुरू झाल्यानंतर अनेक खेळाडू आपापल्या संघात सामील झाले होते. तर अनेक खेळाडू राष्ट्रीय संघातून खेळण्यासाठी आयपीएलपासून दुरावले होते.
आता सर्व गोष्टी लक्षात घेता बीसीसीआयने आयसीसीकडून अडीच महिन्यांची मुदत मागितली होती, जेणेकरून आयपीएलच्या विविध संघांमध्ये विदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतील. जय शाह म्हणाले की, आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा कालावधी घेण्यासाठी बोर्डाने आयसीसी आणि विविध देशांच्या बोर्डांशी चर्चा केली आहे.
जय शाह म्हणाले की, आयपीएल संघांनी देशाबाहेर जाऊन परदेशी संघांसोबत मैत्रीपूर्ण सामने खेळावेत यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. परदेशी संघांशीही याबाबत चर्चा केली जात आहे, मात्र ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी त्या काळात एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही हे पाहावे लागेल.
पुढे जय शाह म्हणाले की, आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग बनली आहे. आयपीएलची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. कोरोनाच्या काळात पुन्हा क्रिकेटचे वातावरण प्रस्थापित करण्यात आयपीएलने महत्त्वाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये डिजिटल स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची संख्या ५६० दशलक्ष होती, मात्र २०२२ मध्ये केवळ ५ वर्षानंतर ही संख्या ६६५ दशलक्ष झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अक्षयला आधीच कळलं होतं ‘पृथ्वीराज’ फ्लाॅप होणार; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ
पुतिन यांचे बॉडीगार्ड त्यांची पॉटी आणि मुत्र पाठवतात रशियाला, वॉशरूमला गेल्यावर करत नाहीत फ्लश