Share

IPL मिडिया ऑक्शनमध्ये BCCI मालामाल, एका सामन्याची किंमत गेली तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या पुढे

आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या टीव्ही आणि डिजिटलच्या मीडिया हक्कांसाठी मोठी बोली लागली होती. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने इतिहास रचला आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांची सर्वाधिक बोली 43,255 कोटी रुपये असून, या बोलीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. (BCCI goods in IPL media auction, the price of..)

आयपीएल मीडिया हक्कांबाबत एक मोठी बातमी आली आहे. भारतात टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे हक्क विकले गेले आहेत. आयपीएल 2023 ते 2027 साठी, टीव्ही हक्क 57.5 कोटी रुपयांना आणि डिजिटल अधिकार 48 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

मीडिया अधिकारांचे पॅकेज-ए आणि पॅकेज-बी एकूण 43,255 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. म्हणजेच एका सामन्यासाठी ही किंमत 105.5 कोटींवर पोहोचली आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. या लिलावात टीव्ही हक्कांची मूळ किंमत ४९ कोटी रुपये ठेवण्यात आली होती, तर डिजिटल हक्कांची किंमत ३३ कोटी रुपये होती. हक्क कोणी विकत घेतले, हे अद्याप जाहीर झालेले नाही.

या लिलावानंतर आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग बनली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने मीडिया हक्कांच्या बाबतीत इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) ला मागे टाकले आहे. आता फक्त इपीएल इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढे आहे.

माध्यम हक्क लिलावात A, B, C आणि D या चार पॅकेजसाठी बोली लावली जात आहे. पॅकेज-ए मध्ये फक्त भारतीय उपखंडासाठी टीव्ही अधिकार समाविष्ट आहेत. यात टीव्ही हक्कांसाठी 23575 कोटी रुपये, डिजिटल हक्कांसाठी 680 कोटी रुपयांची बोली लागली आहे. तथापि, ही किंमत वाढू शकते, कारण पॅकेज-ए विजेत्याला पॅकेज-बीसाठी पुन्हा बोली लावण्याचा अधिकार आहे. दोन्ही पॅकेज एकाच कंपनीने विकत घेतले तर काही हरकत असणार नाही.

गेल्या वेळी बीसीसीआयने आयपीएल मीडिया हक्कांमधून 16,347.50 कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी स्टार इंडियाने पाच वर्षांसाठी (2018-22) आयपीएल मीडिया अधिकार मिळविण्यासाठी ही विक्रमी रक्कम भरली. आता यापुढे हे मीडिया राईट्स बीसीसीआयकडून कोण विकत घेते? हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने शेअर केला डिलिव्हरी व्हिडिओ; ‘अशी’ झाली होती अवस्था
..नाहीतर कारगिल युद्धातच मारले गेले असते परवेज मुशर्रफ, ‘या’ एका कारणामुळे नशीबाने दिली साथ
‘या’ क्रिकेटपटूने IPL मध्ये मिळालेले करोडो रूपये दिले वडीलांना; म्हणाला त्या पैशांपासून मला लांबच ठेवा

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now