bcci end prithvi shaw career | टी २० विश्वचषक २०२२ नंतर भारताला न्यूझीलंड आणि बांगलादेशचा दौरा करायचा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. टीम इंडिया ४ ते २६ डिसेंबर दरम्यान बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
अशात बीसीसीआय एका स्टार खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. वयाच्या २२ व्या वर्षी टीम इंडियाच्या एका स्फोटक फलंदाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपत चालली आहे. हा स्टार खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ. पृथ्वी शॉसाठी निवडकर्त्यांनी कायमचे दरवाजे बंद केल्याचे दिसून येत आहे.
घातक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉमध्ये स्वत:च्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता आहे, मात्र निवडकर्त्यांकडून या खेळाडूची कारकीर्द संपवली जात आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला असून त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. शेवटच्या वेळी हा फलंदाज २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी२० मालिकेत खेळताना दिसला होता.
पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यापेक्षा चांगले शॉट्स मारणारा खेळाडू मानला जातो. पृथ्वी शॉ हा आक्रमक फलंदाज आहे. भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉने भारतासाठी ५ कसोटी सामन्यात ३३९ धावा केल्या आहेत.
पृथ्वी शॉने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने ६३ आयपीएल सामन्यात १५८८ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉचे कसोटीत १ शतक आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, पृथ्वी शॉमध्ये सेहवाग, सचिन आणि लाराची झलक आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया- हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हरदीप सिंग पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया- शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अरविंद यादव सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
महत्वाच्या बातम्या-
Shubman Gill : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शुभमन गिलची बॅट गर्जना, अवघ्या 22 चेंडूत झळकावले झंझावाती शतक शतक
Virat Kohli: कोणीतरी गुपचूप विराटच्या बेडरूममधील व्हिडिओ केला व्हायरल, संतापलेला विराट म्हणाला..
जनतेतून निवडून आलात मग जनतेत जायला कसली भिती, आमदारांचे पोलिस संरक्षण काढून घ्या; ‘या’ आमदाराची मागणी