टोल (Toll)गेल्या काही वर्षांपासून समृद्धी महामार्ग कायम चर्चेत आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. आधी या महामार्गाच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर नामकरणामुळे हा महामार्ग जोरदार चर्चेत होता.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या मार्गावरून नागपूर ते मुंबई प्रवास आठ तासातच होणार आहे. या महामार्गावर टोल किती भरायचा? याबाबत माहिती समोर आली आहे. त्या मार्गावरील लागणाऱ्या टोलच्या बाबतीत एक फलक लावण्यात आला आहे.
त्या फलकावर लावण्यात आलेले दर २०२५ पर्यंत लागू राहणार असल्याचे फलकावर नमूद केले आहे. ते फलक सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. चारचाकी वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर टोल आकारण्यात येणार आहे. म्हणजेच नागपूर ते मुंबई अशा ७०१ किलोमीटरच्या प्रवासाला १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.
हा समृद्धी महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. यात नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे, इत्यादी जिल्हे समाविष्ट आहेत. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस या वाहनांवर २.७९ प्रतिकिलोमीटर असा टोल आकारण्यात येणार आहे.
बस आणि ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर अशा दराने टोल आकारण्यात येणार आहे. तीन आसांची व्यावसायिक वाहने ६.३७ रुपये प्रतिकिलोमीटर तर अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने ९.१८ रुपये प्रतिकिलोमीटर अशा दराने टोल आकारण्यात येणार आहे. अतिअवजड वाहनांसाठी ११.७ रुपये प्रतिकिलोमीटर दराने टोल आकारण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्ग हा मराठवाडा- विदर्भाला असंख्य रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. सध्या नागपूर ते मुंबई अंतर कापण्यात जवळपास १३ ते १४ तास लागतात. पण समृद्धी महामार्गामुळे ते अंतर ७०० किलोमीटर होईल आणि वेळ फक्त ८ तास लागतील. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला हातभार लागेल.
महत्वाच्या बातम्या
Suraj pawar : नायक नहीं खलनायक! ‘सैराट’फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा,पोलिस आवळणार मुसक्या
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
Pune : नवरात्री दरम्यान पुण्यात होतोय तीन दिवसांचा ‘सेक्स तंत्र’ कोर्स; काय आहे नेमका प्रकार? वाचा…
shinde group : राष्ट्रवादीच्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात; थेट शरद पवारांना धक्का






