सोलापुर(Solapur): अडीच वर्षानंतर थाटामाटाने सण समारंभ साजरे करण्यास सुरूवात झाली आहे. काल (शुक्रवार) अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन जल्लोषात झाले. पण अशातच बापाच्या विसर्जनाला गालबोट लागले. सोलापुरातील हतुरे वस्ती परिसरातील एका व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. मृत व्यक्ती वीज महामंडळ म्हणजेच महावितरणमध्ये तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होता.
दोन वर्षांपूर्वी मृत व्यक्तीच्या पत्नीने सुद्धा आत्महत्या करून आपले जीवन संपविले. मृत व्यक्तीच्या मागे आई वडील आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. मृत व्यक्ती ३२ वर्षीय असून विजय भीमाशंकर पनशेट्टी असे त्याचे नाव आहे. विजयच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे, कारण विजयला चार वर्षीय मुलगा आहे.
आता विजय नंतर त्या मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे. गेल्या दोन वर्षांनंतर बाप्पाचे आगमन झाल्याने उत्साह दुपटीने वाढलेला होता. विजय हा गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीवर विजय आपल्या मंडळाला घेऊन मिरवणूक काढत गेला होता.
विजय मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबतच बुडाला. रात्री खूप वेळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. पण विजय सापडला नाही. सकाळी पहाटेच्या सुमारास विजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विजय हा महावितरण मध्ये गेल्या १० वर्षांपासून काम करीत होता. सोलापूर येथील गुरुनानक चौक येथे असलेल्या कार्यालयात त्याची नियुक्ती झाली होती.
विजयने पाच वर्षाच्या आधी प्रेमविवाह केला होता. कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. पत्नीच्या मृत्यूमुळे विजय तणावात होता पण त्याच्या मुलाने विजयचा तणाव घालवला. विजयचा मृतदेह घरी आल्यांनतर सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. चार वर्षीय मुलाला पाहून सर्व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. हतुरे वस्तीमधली विजयचा मृत्यू झालेली विहीर शापित असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या विहिरीत अनेकांनी आत्महत्या केलेली आहे. स्थानिक प्रशासनाने विहीर बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ज्यावेळी विजय विहिरीत बुडाला तो आतील गाळामध्ये अडकला होता. त्याच्या मृतदेहासोबत गाळ, पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात बाहेर आला होता. विजयच्या मृत्यूची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
माणुसकी विकली..! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नाही; वृद्ध मुलाने केलं असं काही की, वाचून तुम्ही ढसाढसा रडालं
‘कुणाचीही युती व्होवो, ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही…,’ युवा सेनेने थोपटले दंड, दिले थेट आव्हान
शिवसेना.. शिवसेना.. शिवसेना..! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच हवा; वाचा नेमकं असं घडलं काय?
गणेशोत्सवात राजकारण तापलं! मुंबईत शिवसेना आणि शिंदेगट आमनेसामने; वाचा नेमकं काय घडलंय?