Share

तब्बल ८०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश, बँकेच्या माजी अध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल

सीबीआय आणि ईडी गेल्या काही वर्षांत जम्मू आणि काश्मीर बँकेविरोधात अनेक प्रकरणांची चौकशी करत आहेत. दरम्यान, सीबीआयने, जम्मू आणि काश्मीर बँकेची 800 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष मुस्ताक अहमद शेख आणि संजय झुनझुनवाला यांच्यासह 20 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे.

सीबीआयला आपल्या तपासादरम्यान दिसले की, आरईआय एग्रो लिमिटेडच्या उच्च व्यवस्थापनासह जम्मू आणि काश्मीर बँकेच्या मुंबई आणि दिल्ली शाखांच्या अधिकाऱ्यांनी 800 कोटी रुपयांचे कर्ज पार केले होते. हे कर्ज REI Agro Limited ला 2011 ते 2013 दरम्यान बँकिंग व्यवस्थेशी छेडछाड करून देण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये हे कर्ज NPA( नॉन परफॉर्मिंग अँसेट) म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले.

सीबीआयला प्राथमिक तपासात असे आढळून आले की, आरईआय एग्रो लिमिटेड ज्याचे कोलकाता येथे मुख्य कार्यालय आणि दिल्लीत कॉर्पोरेट कार्यालय आहे. यांनी मुंबईतील जम्मू आणि काश्मीर बँकेच्या शाखेतून कर्जासाठी अर्ज केला होता.

कंपनीची मुंबईत कोणतीही शाखा नसताना तिच्या माहीम शाखेने आरईआय एग्रो लिमिटेडला 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, तर दिल्लीच्या वसंत विहार शाखेने बँकिंग व्यवस्थेशी छेडछाड करून 135 कोटी रुपये दिले होते. कर्ज घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आहे.

2019 मध्ये, जम्मू आणि काश्मीरच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने जम्मू- काश्मीर बँकेच्या अधिका-यांविरुद्ध बँकेचे 1100 कोटींचे नुकसान केल्याबद्दल एफआयआर नोंदवला होता. यानंतर देशभरात छापे टाकून एसीआयबीने 32 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

त्या आरोपपत्रात आरईआय एग्रो लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष संजय झुनझुनवाला यांनाही आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये जम्मू-काश्मीर सरकारने संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीवरून आता सीबीआयने या प्रकरणी विविध गुन्हेगारी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या एफआयआरमध्ये केवळ 800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी काळात सीबीआय आणखी एफआयआर आणि छापे टाकण्याची शक्यता आहे. सीबीआय फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये या प्रकरणाचा तपास करत आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now