Share

चलनी नोटांवर महात्मा गांधींऐवजी अब्दूल कलामांचा फोटो येणार? रिझर्व बॅंकेने केला खुलासा

nota

अलीकडे इंटरनेटच्या मदतीने आता सगळेच 24 तास अपडेट असतात. मात्र अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या देखील पसरवल्या जातात. मात्र या बातम्या जेव्हा आर्थिक बाबी आणि पैशांशी संबधित असतो त्यावेळी आपले अधिक लक्ष लागते.

गेल्या काही दिवसांपासून भारताच्या चलनावर अर्थात नोटांवर असलेला महात्मा गांधींचा फोटो बदलण्याची चर्चा माध्यमांत मोठ्या प्रमाणात सुरू होती. यावर आता रिझर्व्ह बँकेने मोठा खुलासा करत या सर्व चर्चांना अखेरचा पूर्णविराम दिला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जाहीर केले आहे.

तुम्हालाही माहिती असेल की, गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय चलनात महात्मा गांधी नसून मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्र नाथ टागोर यांची प्रतिमा असेल, असा अहवालात असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

यावर आता अखेर आरबीआयनं स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय चलन नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून, महात्मा गांधींच्या ऐवजी कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. यामुळे आता सोशल मिडियावर सुरू असणाऱ्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, याबद्दल आरबीआयने ट्वीट करत सांगितलं आहे की, “प्रसारमाध्यमांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांचा फोटो लावण्याचा विचार करत आहे, अशा बातम्या येत आहेत. रिझर्व्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी”, अशा आशयाचं पत्रक मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी पोस्ट केलं आहे.

वाचा काय आहे व्हायरल बातमीत.. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम असलेले दोन भिन्न वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक दिलीप टी साहनी यांना पाठवल्याचं नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
आंतरराष्ट्रीय आर्थिक इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now