Body, Kanpur, Bank Manager, Mithali Dixit/ कानपूरमध्ये 17 महिने मृतदेह घरात ठेवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी पोहोचले तेव्हा सहकारी बँकेच्या व्यवस्थापक आणि विमलेशची पत्नी मिताली दीक्षित यांच्या वेदना कागदपत्रांवर नोंदवण्यात आल्या. मितालीने सात वर्षांपूर्वी विमलेशशी लग्न केले होते. दोन मुले झाली आणि आनंदी जीवन जगत होते. एप्रिल 2021 मध्ये, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मितालीच्या आयुष्यावर असे वादळ आणले की सगळच होत्याच नव्हत झाल.
जिवाची काळजी घेण्याचे आश्वासन देत ज्याच्याशी सात फेरे घेतले, त्याच्याच मृतदेहाची काळजी घ्यावी लागली. मिताली म्हणाली, मला माहित आहे की त्याने श्वास सोडला आहे. मी सुहासिनी नव्हते पण काय करणार… तो त्याच्या आईसाठी जिवंत होता. पप्पांना त्याच्या छातीचे ठोके जाणवत होते. त्यांच्या या विश्वासाने मला हे सर्व करण्यास भाग पाडले.
काय म्हणणार की, तुमचा मुलगा मेला आहे? आता काय तपासणार? गेले अनेक महिने मी त्याच्या नावाने कुंकू लावत राहिले. विचार करा, कुंकू भरताना मी किती वेळा मरण यातनेतून जात असेल? माझी परिस्थिती मला रडू देत नव्हती. मुलं म्हणायची, वडिलांना उठव न आई, मी आत जाऊन रडायचे. माझ्या या दुर्दैवाची चौकशी करायची असेल तर करा… त्यांना जिवंत समजून आम्ही काय गुन्हा केला आहे…?
17 महिन्यांपर्यंत असेच चालू होत एक किंवा दोन दिवस नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबानीत अपार वेदना दडलेली आहे. ती म्हणाली, विमलेशची आई आपल्या मुलाला जिवंत समजत होती, वडील आणि भाऊही तिच्याकडे आईच्या नजरेने बघत होते, मला सांगा मी काय करू? आपला मुलगा जिवंत आहे असे वाटणाऱ्या आईसमोर तिने बांगड्या फोडू का? कुंकू पुसून टाकू का?…माझ्यासाठी या 17 महिन्यांत भांगात कुंकू लावणे ही शिक्षा झाली होती.
विमलेशच्या मृत्यूचे सत्य मी जगापासून लपवून ठेवले… पण का? काही लोभ होता का? त्यांच्या कार्यालयात विचारा, आम्ही त्यांच्या पगारावर, वैद्यकीय किंवा कोणत्याही प्रकारचा दावा केला आहे का? या कुटुंबाने असा कोणताही दावा केला नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. जगभर गाजलेल्या विमलेशच्या कथेचा काही भाग मितालीच्या डोळ्यांच्या पापण्यांवरून कधीही न सांडणाऱ्या अश्रूंनी लिहिला आहे, हेही यातून स्पष्ट झाले आहे.
मितालीसह संपूर्ण कुटुंबाचे बयाण नोंदवल्यानंतर उर्वरित वस्तुस्थिती तपासण्यात येत असल्याचे सह पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले. आतापर्यंत या कुटुंबाने विमलेशच्या कार्यालयातून कोणत्याही प्रकारचा नफा घेतल्याचा कोणताही पुरावा नाही.
महत्वाच्या बातम्या-
Amit Thackeray : …अन् अमित ठाकरेंनी थेट जॅकी श्रॉफचे धरले पाय, कार्यक्रमात नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
Sushma Andhare : “आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
health : चुकीच्या पद्धतीने शिजवलेला भात खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण? संशोधनातून समोर आलं भयंकर सत्य






