बांग्लादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायमा इस्लाम शिमू असे या मृत अभिनेत्रीचे नाव आहे. बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रीजजवळ सोमवारी तिचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, रायमा शिमू ढाका येथे तिच्या पती आणि मुलांसोबत राहत होती. रविवारी ती शूटिंगसाठी घरातून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. तिच्या कुटुंबीयांना वाटले की, ती शूटिंगमध्ये बिझी असेल. मात्र, रात्री उशीरापर्यंत ती घरी न परतल्याने याबाबत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपोर्टनुसार, बांग्लादेश पोलीस २ दिवस रायमाला शोधत होते. मात्र, तिच्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर सोमवारी अचानक केरानीगंजच्या आलियापूर येथील हजरतपुर ब्रिजजवळ तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संबंधित परिसरातील काही नागरिकांनी गोणीतून दुर्गंधी येत असल्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
https://twitter.com/ians_india/status/1483333592302645248?s=20
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हा मृतदेह प्रसिद्ध अभिनेत्री रायमा शिमूचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, रायमाच्या मानेवर जखमा दिसून आल्या. आरोपींनी सुरुवातीला तिला जखमी केले. त्यानंतर तिची निर्घूणपणे हत्या केली.
याप्रकरणात पोलिसांनी रायमाचा पती सखावत अमीन नोबेलो आणि इतर ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एक कारही जप्त केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या कारच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तसेच रायमाच्या पतीनेच ही हत्या केल्याचं कबूल केल्याचेही वृत्त समोर येत आहे.
बातम्यानुसार, पोलिसांच्या चौकशीत रायमाचा पती सखावतने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. घरातील वादांमुळे सखावतने त्याच्या मित्रांसोबत मिळून रायमाची हत्या केल्याची कबूली दिली. दरम्यान, पोलिसांनी रायमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाची अधिक तपासणी करत आहे.
रायमा शिमूच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तिने १९९८ साली आलेल्या ‘बार्तामान’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने काही मालिकांमध्येही काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
लारा दत्ताने सलमानच्या ‘या’ सवयीचा केला खुलासा; म्हणाली, तो आताही मध्यरात्री उठून मला..
कुणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी झाली होती धनुष आणि रजनीकांतच्या मुलीची पहिली भेट; वाचा कसे पडले एकमेकाच्या प्रेमात
‘पावनखिंड’चा थरार पाहायला व्हा तयार; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट