ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक त्यांच्यावर आक्रमक झाले असून सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहे. (bandatatya karadkar criticizes supriya sule and pankaja mundhe)
राज्य सरकारच्या या निर्णयावर आता वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, त्यांनी मला विचारावे, मी त्यांचे आव्हान स्वीकारून पुराव्यासहीत सिद्ध करून दाखवायला तयार असल्याचे कराडकर यांनी म्हंटले.
राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे गुरुवारी साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला. कराडकर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तसेच यावेळी पुढे बोलताना तात्या म्हणाले, सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात. राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील. कराडकर यांच्या या विधानामुळे आता राजकारण चांगलेच तापणार आहे. मात्र अद्याप पंकजा मुंढे आणि सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
ते म्हणाले, ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत. दारु आणावी, मंदिरं बंद करावीत सप्ते बंद करावेत, वाऱ्या बंद कराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे पुढारी नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.”
दरम्यान, दारूविक्री माता-भगिनी आणि महिलांचे संसार धुळीला मिळाले आहेत तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर गावागावातील वारकरी ते दुकान जाळल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने आम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शासनाला आम्ही आंदोलनातून वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यायलाच लावू असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
आश्चर्यकारक! लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीने दिला बाळाला जन्म, तरीही धुमधडाक्यात लावून दिले तिचे लग्न
नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा
VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ
‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदमला ३० मुलांनी दिलाय लग्नासाठी नकार, कारण वाचून अवाक व्हाल