राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून ते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. (bandatatya karadkar criticizes uddhav thackeray and ajit pawar)
शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. आता या निर्णयावर आता वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे गुरुवारी साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले.
या आंदोलनावेळी कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत. दारु आणावी, मंदिरं बंद करावीत सप्ते बंद करावेत, वाऱ्या बंद कराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे पुढारी नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.”
दरम्यान, दारूविक्री माता-भगिनी आणि महिलांचे संसार धुळीला मिळाले आहेत तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर गावागावातील वारकरी ते दुकान जाळल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.
तर दुसरीकडे आज साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला. कराडकर यांच्या या विधानामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा सध्या विरोधक विरोध करत आहेत. त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. हे राज्य शिवछत्रपतींचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, इथे वाईन विक्री सारखे निर्णय खपवून घेतले जाणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
थेरगाव क्वीनसोबत व्हिडिओ बनवणाऱ्याची पोलिसांना पाहताच टरकली, म्हणाला…
‘थेरगाव क्वीन’सोबत डायलॉगबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; हात जोडत म्हणाला…
असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव; वाचा नेमकं काय घडलं..
घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी