आम्ही तुम्हाला एक वेगळी कथा सांगणार आहोत. ही कथा वाचून तुम्ही देखील या शेतकऱ्याच कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. शेती पिकवत असताना आपल्याला जास्त मदत लागते ती कामगारांची..! आपण त्यांना रोजगार देऊन मोकळे होते. मात्र आता आम्ही तुम्हाला एका अनोख्या शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत.
भडगाव तालुक्यातील वाडे गावात राहणाऱ्या राजेंद्र हरी पाटील यांची ही अनोखी गोष्ट आहे. पाटील यांच्याकडे दीड एकर शेती आहे. तसेच पाटील यांनी ३० एकर शेती भाडे तत्वावर करायला घेतली. कौतुकाची बाब म्हणजे पाटील यांनी आपल्या शेतीत त्यांनी ५० हजार केळीच्या टीशू कल्चर रोपांची लागवड केली.
रविंद्र पाटील यांनी या ३० एकरात तब्बल दीड कोटी रुपयांचं उत्पन्न घेतलं. या उत्पन्नामागे शेतात राबणाऱ्या कामगराचाही मोलाचं वाटा असल्याने हे उत्पन्न मिळालं अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे. कामगार माझा परिवार आहे, आणि यांच्यामुळे मी कोट्यधीश बनलो असं पाटील यांनी सांगितलं.
कौतुकाची बाब म्हणजे, पाटील यांनी कामगारांप्रती कृतज्ञता जोपण्यासाठी दिपोत्सव कार्यक्रमाचं गावात आयोजन केलं. सध्या या अनोख्या उपक्रमाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पाटील यांनी कार्यक्रम घेवून कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत, त्यांच्या कुटुंबीयांना कपडे देत, कामगारांचा सन्मान केला.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर