‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumamachya Navana Changbhala) ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या माध्यमातून संत बाळूमामांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यादरम्यान आता या मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मालिकेच्या सेट निर्मात्याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली असून त्यांचा पाय मोडण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे वृत्त लोकमतने दिली आहे.
रिपोर्टनुसार, तक्रारदार सेट निर्मात्याचे नाव अलंकार भावरे असे आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ते गोरेगाव पूर्वच्या फिल्म सिटीमध्ये चित्रपट आणि मालिकांचे सेट लावण्याचे काम करतात. याच फिल्म सिटीमध्ये बाळूमामा मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. तर ४ मार्च रोजी त्यांनी अप्पू टप्पू मैदान येथे बाळूमामाचा सेट लावला.
सेट लावून झाल्यानंतर दुपारी ते जेवायला बाहेर गेले होते. जेवण करून परतल्यानंतर त्यांना ड्रेसमॅन करण हा सेटवर झोपलेला दिसला. त्यामुळे त्यांनी त्याला उठवत सेटवर झोपण्यास नकार दिला. पण करणने हुज्जत घातली. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि दोघांत हाणामारी झाली.
भांडणाचा आवाज ऐकून मालिकेचे दिग्दर्शक बाबासाहेब आणि सहाय्यक दिग्दर्शक समीर दोघेही तेथे आले. तर या दोघांनीही भावरे यांच्यावर हात उचलला. तर करणने लोखंडी सळईने त्यांच्या पायावर मारहाण केली. त्यामुळे त्यांचा उजवा पाय मोडला, असा दावा भावरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी भावरे यांनी पोलिसांना फोन केला असता तिथे आरे पोलीस पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी भावरे यांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण ज्या पोलिसांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले त्यांनी याबाबत चौकशी केली नाही किंवा याबाबत कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.
या उलट भावरे यांच्याकडून पोलिसांनी तीन-चार कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या, असा दावा भावरे यांनी केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. याप्रकरणी भावरे यांनी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांना न्याय देण्याची मागणी केल्याचेही, यामध्ये सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
तुझ्या मुर्ख बायकोला समजाव नाहीतर.., ट्विंकलच्या ‘या’ कृतीमुळे अक्षयकुमारवर भडकले लोकं
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ
..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण