सण-उत्सवात लोक आपल्या श्रद्धेसाठी प्राण्यांचा बळी देतात. बलिदानाच्या वेळी अनेक वेळा अशा काही अनपेक्षित घटना घडतात. असाच एक प्रकार नुकताच आंध्र प्रदेशामधून समोर आला आहे. जिथे सणानिमित्त एका बकऱ्याचा बळी दिला जात होता. त्यावेळी एका मद्यधुंद तरुणाने बकऱ्याऐवजी बकऱ्याला पकडलेल्या व्यक्तीची मान कापली आहे.
ही घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्तूर येथील वलसापल्ले येथील एका मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाचा विधी केला जात होता. या गावातील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. नेहमीप्रमाणे या वेळीही हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी एक बोकड आणण्यात आले होते आणि त्याचा बळी द्यायचा होता. मात्र या कार्यक्रमादरम्यान असे काही घडले की त्यामुळे एकच खळबळ उडाली. जो बकऱ्याचा गळा कापणार होता त्याचे नाव चालपथी आणि ज्याने बकरी पकडली होती त्याचे नाव सुरेश आहे. बलिदान सुरू असताना अचानक चालपथीने बकऱ्याऐवजी सुरेशचा गळा कापला. त्याची मान कापताच तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारूच्या नशेत होता आणि त्याने दारूचे सेवन केले होते. दरम्यान, सुरेशला जवळच्या मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला आहे. सुरेश हे काही लोकांच्या वतीने परंपरेनुसार एका प्राण्याचा बळी देत होते आणि त्या बोकडाला धरून होते.
अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. चालपथीचा सुरेशसोबत काही वाद होता का, याची पोलीस चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू करण्यात आला असून संबंधित पक्षांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यलम्मा देवीच्या प्राचीन मंदिरात संक्रातीला बकऱ्याचा बळी दिला जातो. स्थानिकांनी दलेल्या माहितीनुसार, ही प्रथा फार जुनी आहे. संकारातील लोक जनावर घेऊन मंदिर परिसरात येतात. मंदिरजवळ घेऊन आल्यानंतर लोक विधी करून त्या जनावराचा बळी देतात. मृत व्यक्ती सुरेशदेखील जनावराचा बळी देण्यासाठी मंदिर परिसरात आला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘विराट कोहलीला हटवण्यास गांगुलीच जबाबदार’; दिग्गज खेळाडूने उघडली बीसीसीआयची पोल
कोहलीचा गेम करून गांगुलीने भारतीय क्रिकेटलाच हादरा दिला; दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
समाजवादीने राष्ट्रवादीला दिलेली जागा परत घेतल्याची बातमी खोटी; बड्या नेत्याने दिली वेगळीच माहिती