उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey): वारकरी ज्याप्रमाणे आषाढ, कार्तिक महिन्यात विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरपर्यंत पायी जातात. त्याचप्रमाणे शिवसेना अखंड राहावी याकरिता दक्षिण सोलापुरातून मुंबईपर्यंत शिवसैनिक पायी चालत गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांची भेट घेतली. उत्तम शिंदे हे ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी आले होते.
त्यांनी सतत १४ दिवस पायी प्रवास केला. २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास होता. डोळ्यात अश्रू हातात भगवा घेऊन शिवसैनिक मुंबईत पोहचले. मातोश्रीवर जाऊन जणू ‘देवाचे दर्शन’ झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. उत्तम शिंदे यांना बाळासाहेबांनी ‘प्रति दादा कोंडके’ असे संबोधले होते.
सोलापूरच्या उळे येथील उत्तम शिंदे हे शिवसेना उमेदवारांचा विधानसभा, लोकसभा अथवा ग्रामीण पातळीवरील निवडणुकांमध्ये प्रचार करतात. ते दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची भूमिका बजावून मतदारांना आकर्षित करतात. म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तम शिंदेंना आशीर्वाद देत ‘प्रति दादा कोंडके’ असं संबोधलं होतं.
ठाकरेंची भेट घेण्यासाठी तब्बल १४ दिवसांचा पायी प्रवास करुन सोलापूरहून मुंबईला आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे नेते म्हणून दादा कोंडकेंनी शिवसेनेसाठी जाहीर भाषणंही केली आहेत.
स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ तमाम शिवसैनिकांसाठी प्रती पंढरपूरच
वारकरी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन विठूरायाच्या नामाचा गजर करत पायी वारी करतात. आपल्या मनातील पांडुरंगाप्रती भाव व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे वारकरी कसलाही विचार न करता पायी चालत पंढरपूरला जातात. त्याप्रमाणे सोलापूर ते मुंबईला स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापर्यंत पायी वारी असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले होते.
स्मृतीस्थळरुपी पंढरीत पोहचले. त्यांनतर बाळासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर तमाम शिवसैनिकांचा प्रतिनिधी म्हणून उत्तम शिंदेंनी शिवसेनेच्या अखंडतेसाठी साकडं घातलं. ते म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ तमाम शिवसैनिकांसाठी प्रती पंढरपूरच आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena: शिवसेनेची ‘ती’ मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत दिला मोठा धक्का, शिंदे गटाचा मार्ग झाला सोपा
Uddhav Thackeray: बंडखोर आमदाराच्या बहिणीने उद्धव ठाकरेंना दिली हजारो शपथपत्र; म्हणाल्या, ठाकरे कुटुंबावर…
मराठी लोकं साऊथचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जातात पण मराठी चित्रपट का पाहत नाहीत? महेश मांजरेकरांचा सवाल
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले