Share

Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा खास माणूस उद्धव ठाकरेंच्या सेवेला; मिलिंद नार्वेकरांच्या जागी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?

uddhav thackeray and mhatre

Uddhav Thackeray: शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जे आरोप केले. त्यातील एक महत्त्वपूर्ण आरोप म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आसपास असणारे लोक त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाहीत. आमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात नाही. आता याबाबत उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा वर्तुळ बदलण्याचे संकेत दिले आहेत.

गोरेगावमध्ये उद्धव ठाकरेंनी बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यादरम्यान घडलेल्या एका गोष्टीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. उद्धव ठाकरेंच्या आसपास सतत एक व्यक्ती फाईल हातात घेऊन फिरत असताना दिसली. ती व्यक्ती म्हणजे रवी म्हात्रे. रवी म्हात्रे यांना उद्धव ठाकरे यांच्या आसपास पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र या चित्रावरून रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंच्या स्वीय सहाय्यकाचे काम यापुढे करतील, असे बोलले जाते.

शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंपर्यंत आम्हाला न पोहोचू देण्यास ठाकरेंजवळील चौकडी जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्या आमदारांचा रोख संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्याच दिशेने होता. आता याच नार्वेकर यांना पूर्णपणे पक्ष कार्याचे काम सोपवून सहाय्यक पदाचा त्यांचा भार हलका केल्याचे दिसते.

पण लोकांना प्रश्न पडला असेल, हे रवी म्हात्रे कोण? तर रवी म्हात्रे हे बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे मानले जात. २००४ पासून बाळासाहेबांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मातोश्रीवरून बाळासाहेबांकडून येणारे सगळे निरोप म्हात्रे द्यायचे. बाळासाहेबांना केलेला फोन प्रथम म्हात्रे उचलायचे.

रवी म्हात्रे आमदारांच्या, खासदारांच्या, सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा बाळासाहेबांपर्यंत पोहोचवायचे. साहेबांच्या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे कामही तेच बघत. रोजचा न्युज पेपर बाळासाहेबांना वाचून दाखवण्याचे त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी घेण्याचे कामही तेच करत. म्हात्रे शिवसैनिकांना मित्राची वागणूक देत, असे काही माहितगार लोक सांगतात.

मिलिंद नार्वेकर यांच्यावर आमदारांनी आरोप केले. त्याच मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. तसेच २०१८ साली त्यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र आताची परिस्थिती बघता त्यांच्यावर पक्षाचे काम सोपवून रवी म्हात्रे यांना पुन्हा सहाय्यक करण्यात आल्याचे दिसते. तसेच दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंचं लॉन्चिंग होण्याची चर्चा आहे. या सर्व गोष्टींमुळे शिवसेनेत नव्या लक्षणीय बदल घडणार असल्याचे चित्र दिसतेय.

महत्वाच्या बातम्या-
deepak kesarkar : शिंदे एवढे काम करतात की, शेवटी त्यांना सलाईन द्यावं लागतं, मगच ते उद्यासाठी तयार होतात; केसरकरांचा गौप्यस्फोट
wine discision: शिंदेगट म्हणतोय मॉलमध्ये वाइन विक्री शेतकऱ्यांच्या हिताचीच, आता फडणवीस काय भूमिका घेणार?
Narayan rane : उद्धव ठाकरे म्हणजे एक नंबरचा लबाड लांडगा, आयत्या बिळावरचा नागोबा – राणेंचा घणाघात

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now