politics: शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब दसऱ्याला राज्यभरातील शिवसैनिकांना एकत्र करून शिवतीर्थावर मेळावा घेत, तीच परंपरा पुढे कायम राखत दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र आता शिवसेनेतील काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा कशाप्रकारे पार पडेल? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला. मात्र शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला. महानगरपालिका नक्की कोणाला परवानगी देते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे तडफदार नेते गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा विचारांचा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मिक्स विचारांचा आहे.’
पुढे ते असेही म्हणाले की, ‘आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!’ अशा प्रकारचे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. गुलाबराव पाटील त्यांच्या तडाखेबाज भाषणांसाठी ओळखले जातात. मात्र यावेळी केलेल्या अजब वक्तव्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
मात्र या निमित्ताने या दोन्ही गटातील वाद किती टोकाला गेले आहेत. हे पुन्हा एकदा राज्यातील जनतेसमोर आले. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेणार, यावर ठाम आहे. मात्र जर शिंदे गटाने दसरा मेळावा आपण घेणार, अशी भूमिका घेतल्यामुळे येत्या काळात मोठी खडाजंगी होणार आहे.
दुसरीकडे दसरा मेळाव्याची जोरदार तयारी शिवसेनेकडून सध्या केली जात आहे. मेळाव्याच्या ठिकाणाबाबत थोडा संभ्रम लोकांमध्ये असतानाच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे बॅनर्स मुंबई ठिकठिकाणी लावले आहेत. या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचे थेट आमंत्रण त्यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Coins : चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला! 10 रुपयांची नाणी न स्वीकारल्याने युनियन बँकेला भरावा लागला दीडशे पट दंड
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक
terrorist : धक्कादायक! कराटेच्या क्लासेसमधून दिलं जातंय दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण, ‘या’ राज्यांचा आहे समावेश