Share

“बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळते, ते उद्धव ठाकरेंची जागा घेणार”

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. राज ठाकरे यांना आता भाजपने देखील या मुद्यावरून साथ दिली आहे. भाजप खासदार नवनीत राणा यांनी देखील नुकताच उद्धव ठाकरे यांना याबाबत इशारा दिला होता, ज्यावर शिवसैनिकांनी आंदोलन करत उत्तर दिलं. मात्र, यावरही आता नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत.

नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, असे आव्हान केले होते. यावर अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी नवनीत राणा यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.

झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, आंदोलक शिवसैनिक देवाचे नाम स्मरण करण्यासाठी आले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. पण शिवसैनिक फक्त मुर्दाबादच्या घोषणा देण्यासाठी आले होते, तसेच त्यांनी बांगड्या फेकल्याचा आरोप देखील नवनीत राणा यांनी केला.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि प्रश्न केला की, बाळासाहेबांची विचारधारा उद्धव ठाकरे विसरले का? तसेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यामध्ये शंका नाही असेही त्या म्हणाल्या, तसेच म्हणाल्या, आदरपूर्वक शिवसैनिकांनी मला बांगडया दिल्या असत्या तर मी घातल्या असत्या.

पुढे म्हणाल्या, आंदोलन करण्यासाठी आलेल्या सर्व महिला माझ्या जिल्ह्यातील महिला आहेत त्यामुळे त्यांनी संस्कृती जोपासली पाहिजे. ते हनुमान चालिसा वाचण्यासाठी आले नव्हते तर फक्त घोषणाबाजी करण्यासाठी आले होते, असे राणा म्हणाल्या.

घडलेल्या प्रकरणाबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणा म्हणाल्या की, मला वाटलं राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यामध्ये काहीही शंका नाही. कारण तुम्ही तुमची विचारधारा सोडलेली आहे पण बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची शिकवण सोडलेली नाही.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now