Share

“रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?”

Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय फिरवण्याचा सपाटा लावला आहे. यावरून आता विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नुकताच शिंदे – फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत एक निर्णय घेतला.

फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता कॉंग्रेसने आपक्षेप घेत टीका केली आहे. याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील आमदारांचा निधी थांबवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

मागच्या सरकारने म्हणजेच ठाकरे सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पावर ९० टक्के चर्चाही केल होती. याचबरोबर फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. यातून महाराष्ट्रात रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तब्बल या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते.

मार शिंदे – फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला. यावरूनच थोरात यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना थोरात यांनी महाविकास आघाडीने केलेली कामे सांगताना म्हंटलं आहे की, ‘आमच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली. यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले.’

मात्र मविआचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असं प्रश्नचिन्ह थोरात यांनी उपस्थित केलं. ‘हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले? असा सवाल देखील थोरात यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now