Share

“बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी मुस्लिमांना पाठिंबा दिला, मशिदीवरील भोंगे काढा अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती”

महाराष्ट्र राजकारणात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशिदींवरील भोंग्यावरून अनेक पातळीवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले यावेळी सोलापुरात होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. म्हणाले, राज ठाकरे हे कधीच बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नव्हती. असे आठवले म्हणाले.

तसेच म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. फक्त दहशतवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोपं काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकणार नाहीत. असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला रामदास आठवले यांचा पहिल्यापासून विरोध आहे. याआधी देखील आठवले यांनी भोंग्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले होते. आठवले म्हणाले होते की, मशिदीवरील भोंग्याचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रक्षण करतील.

तसेच म्हणाले होते की, अजानची वेळ दोन ते तीन मिनिटे असते. भोंगे दिवसभर वाजत नसतात. तसाच मुस्लिमांना संविधानाने काही अधिकार दिले आहेत. कोणी संविधानविरोधी काम करत असेल तर आम्ही त्याला विरोध करू, अशी भूमिका आठवले यांनी मांडली होती.

दरम्यान , राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी बुधवार म्हणजे 4 तारखेपासून आंदोलन पुकारलं आहे. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now