गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी (bandatatya karadkar) महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल देखील वक्तव्य केलं होतं. दिवंगत नेते पंतगराव कदम यांचा मुलगा अभिजित कदम याच्या अपघाती निधनाबद्दल आणि सहकारमंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दल देखील कराडकर यांनी वक्तव्य केलं होतं. (balasaheb patil said he will file defamation case against bandatatya karadkar)
त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला. बाळासाहेब पाटील आता हे देखील कराडकर यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र या मागचा बोलवता दुसरा कोण तरी आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘बंडातात्यांना कल्पना आहे की मागील सात वर्षापासून माझा मुलगा पंढरीची वारी करत आहे, अस असताना चुकीचा आरोप त्यांनी केला याबाबत माझ्या मुलाने बंडातात्या कराडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तर अखेर बंडातात्या कराडकर यांना माफी मागावी लागली. वाईन धोरणाविरोधात बोलताना कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती.
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच वादात सापडले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग निर्माण झालं आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांना अखेर माफी मागावी लागली.
माफी मागताना कराडकर म्हटले की, ‘ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये,’ असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पोलीस स्टेशनमधून बाहेर येताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा, तरुणाच्या खांद्यावर बसली अन्…; व्हिडिओ व्हायरल
काॅंग्रेस देणार गरीबांना न्याय; महीन्याला ६ हजार रूपये मोफत देण्याचा राहूल गांधींचा शब्द
…तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या’, तिकीट नाकारलेल्या पार्सेकरांचे फडणवीसांना खुलं आव्हान
“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”