Share

शिवसेनेचा उमेदवार पडल्यानंतर बाळासाहेब फक्त एक ग्लास.., संजय शिरसाठ यांनी सांगितला किस्सा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थन करण्यासाठी हजारो कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईला घेऊन जात आमदार संजय शिरसाट यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिरसाट यांनी जोरदार भाषण करत अनेकांचा समाचार घेतला. (Balasaheb just a glass after the fall of the Shiv Sena candidate .., Sanjay Shirsath told)

संजय शिरसाट यांनी म्हंटले की, बाळासाहेब एखाद्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले आणि जर शिवसेनेचा उमेदवार पडला तर घरी येऊन ते फक्त एक ग्लास दूध पीत आणि मला कोणाला भेटायचं नाही, असं सांगत. त्यांना आपला शिवसैनिक पडल्याचं दुःख व्हायचं.

परंतु आजकाल काही नेते, कायपण झालं की रोज शरद पवारांचे गुणगान गात असतात, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला. यामिनी जाधव यांना कॅन्सर आहे. त्यांचा एक किस्सा यावेळी संजय शिरसाटांनी सांगितला.

यामिनी जाधव आजारी असताना त्यांनी एकदा मोठ्या नेत्याला फोन केला. साहेब, मी या अधिवेशनाला येऊ शकत नाही कारण मी आजारी आहे, असे सांगितले. मंत्र्याने ऐकून घेतले आणि फोन ठेवून दिला. अरे साधी विचारपूस तरी करायची, असं म्हणत त्यांनी यामिनी जाधव यांची दखल न घेतल्याचा, त्यांना सहानुभूती देखील न दाखवल्याचा आरोप केला.

एका मोठ्या मंत्र्याकडे काम घेऊन गेल्यावर त्याच्या जवळच्या माणसाने सांगावे, काम करून देईल तर १० टक्के मला हवे. अरे काय,.. एखाद्या मंत्र्याची दहा टक्क्यांसाठी अशी लाचारी? आणि आज हेच आम्हाला शिकवतात खरी शिवसेना काय आहे, असं देखील ते म्हणाले.

अंबादास दानवे यांच्यावर शिरसाट यांनी सडकून टीका केली आहे. घरातच ज्याची बायको त्याला ऐकत नाही. त्याने सांगावं काय, गद्दार पुढच्या वेळी निवडून येणार नाहीत, असंही ते म्हणाले. रात्रीची सभा घेण्याची एकनाथ शिंदेंमध्ये ताकद आहे. आमचे मुख्यमंत्री रिक्षा चालक आम्ही रिक्षा चालक असं म्हणत शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
रावसाहेब दानवेंचा मुलगा झाला शरद पवारांचा फॅन, म्हणाला, त्यांच्या राजनैतिक कौशल्यातून मला…
धोनीला बारावीत पडले होते ‘एवढे’ टक्के, तर कोहलीने दहावीनंतर शाळेचं तोंडपण पाहिलं नाही
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी झाली गायब, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now