shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता जातीने पक्षाकडे लक्ष्य देताना पाहायला मिळतं आहे. एकीकडे राज्यात झालेलं सत्तांतर तर दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती या दोन कारणांमुळे सध्या ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे कुठतरी पक्षाला सावरण्याचे काम करतं आहेत.
मधल्या काळात अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. याचे धक्के थेट उद्धव ठाकरेंना बसले. मात्र असं असलं तरी देखील अजूनही काही व्यक्तींची पक्षनिष्ठा कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक जण पुन्हा शिवसेनेत येत आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा फायदा होणार असल्याचं बोललं जातं आहे.
सत्तांतर होताच अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठे धक्के बसले आहेत.
पुन्हा पुण्यात शिवसेनेला उभारणी देण्यासाठी उद्धव ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आता पुण्यात शिवसेनेला बळ मिळालं असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे असलेले बाळासाहेब दांगट हे १९९० आणि १९९५ मध्ये जुन्नर तालुक्यातून लोकप्रतिनिधी होते. मात्र २००४ मध्ये दांगट दारुण पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी याच कारणावरून शिवसेनेला रामराम ठोकला अन् त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मात्र आता त्यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेब दांगट हे कशी कामगिरी बजवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून अनेक प्रयत्न केले जातं आहे.
eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?
Shiva temple : शिवमंदिरात घुसले चोरटे, सोने-चांदी चोरल्यानंतर दानपेटीला हात लावताच घडलं असं काही..
Optical Illusions: या फोटोत सर्वात आधी तुम्हाला काय दिसतंय? चेहरा की उंदीर? यावरून ठरतो तुमचा स्वभाव, वाचा..