Share

पुन्हा नवा ट्विस्ट! भाच्याने केला खळबळजनक दावा; “…अन् तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”

१४ ऑगस्ट रोजी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं मुंबई पुणे एक्सप्रेसवर अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण आता यात आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

14 ऑगस्टच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात मेटेंना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मात्र त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तपासादरम्यान अनेक वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता या प्रकरणाला पुन्हा नवीन वळण लागणार असल्याच बोललं जातं आहे.

वाचा नेमकं बाळासाहेब चव्हाण यांनी काय म्हंटलंय?
माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला असल्याच बोललं जातं आहे. मेटे यांचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना बाळासाहेब चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती, मात्र त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा खळबळजनक दावा मेटे यांच्या भाच्याने केल्याने आता खळबळ उडाली आहे.

पुढे पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितलं की, ‘मी एका व्यक्तीला फोन केला. त्याने मला सांगितले की, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही, मात्र मेटे यांचे निधन झाले आहे. हे समजल्यानंतर मी तातडीने कदम यांना संपर्क साधला.’

मात्र तेव्हा कदम बोलले की साहेब बरे आहेत, २० मिनिटे मी साहेबांसोबत बोलतोय. मात्र, त्यानंतर मी तात्काळ मेटे यांना संपर्क केला, मात्र मेटे यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर कदम यांच्या बोलण्याबाबत काय समजायचे? असा संतप्त सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या
घरात शांतता हवी असेल तर, पत्नी पतीला घराबाहेर काढू शकते; न्यायालयाचा मोठा निर्णय
३ऑगस्टला मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या कार मालकाने सांगितला खरा किस्सा; म्हणाला…
शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टात नागरिकांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल
पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा पाहत जा, भाजपचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now