मातोश्रीवर बाळासाहेब आनंद दिघेंची गुरूपोर्णिमा! ‘धर्मवीर’चे गाणे तुफान हिट; २० तासांत २० लाख व्ह्यूज

महाराष्ट्र राज्याला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. राजकीय क्षेत्रातील गुरू शिष्य जोडीबद्दल बोलायचे झाल्यास, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची गुरू-शिष्य जोडी अवघ्या महाराष्ट्राने बघितली आहे. त्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच येणार आहे.

धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी भक्ती दुर्गामातेसाठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं, असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘गुरुपौर्णिमा’ या गाण्याला केवळ 20 तासांमध्ये 20 लाखांहून अधिक प्रेक्षकवर्ग लाभला असून हजारो लोकांनी हे गाणं आपापल्या पेजवरून शेअरही केलं आहे. युट्यूबवर सुद्धा हे गाणे नंबर 1 ला ट्रेडिंगमध्ये आहे. सध्या या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यातील नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आला आहे. हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले.

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यातील नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आला आहे. हे गाणं 25 तारखेला प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले.

जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचा टिझर समाजमाध्यमांवर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. येत्या 13 मेला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते.