bajiprabhu deshpandes vanshaj on harhar mahadev | नुकताच हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटावरुन आपल्याला वाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर हर हर महादेवचे शोही बंद पाडण्यात आले आहे. आता या चित्रपटाचा वाद आणखी चिघळताना दिसून येत आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. तसेच इतर अनेक मुद्यांवरुनही आक्षेप घेण्यात येत आहे. याप्रकरणी आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आक्षेप घेतले आहे.
रुपाली देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्या म्हणाल्या की, बाजीप्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सुभेदारवाडी शिंद गावातील रहिवासी होते. पुण्यापासून ते ६० किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे मूळ आडनाव प्रधान आहे. क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम त्यांनी केला आहे. या चित्रपटाबाबत अनेकजण आक्षेप घेत होते. त्यानंतर आम्ही हा चित्रपट पाहिला. आता आमचाही यावर आक्षेप आहे.
त्यांनी मुद्देसूदपणे आक्षेप मांडले आहे. त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. असे असतानाही बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला आहे. हे दाखवणे पुर्णपणे चुकीचे आहे.
तसेच हिरडस मावळ येथे समूद्र किनारा दाखवला आहे. पण प्रत्यक्षात पाहता तिथे नीरा नदी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रीयन मुलींना इंग्रज घेऊन जाताना दिसत होते. त्यावेळी इंग्रज खरंच इकते शक्तिशाली झाले होते का? इतिहास तज्ज्ञांनी सुद्धा हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे हे सख्खे भाऊ होते. पण सिनेमाच्या नावाखाली त्यांच्यात वाद दाखवला आहे.त्यामुळे फुलाजी देशपांडे यांची प्रतिमा मलीन होत आहे. ते दोघेही शेवटपर्यंत आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी लढले होते.
सिनेमात ड्रामा असतो पण काल्पनिक कथेत तो असतो. ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे चुकीचे असू शकते. अफजल खानाचा वध झाला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे हजर नव्हते. पण चित्रपटात ते हजर दाखवले आहे.
शिवा काशीदचा पराक्रमही नाकारल्यासारखा केलाय आहे. बाजीप्रभू हे बांदल देशमुख यांचे सरनौबत होते. त्यांच्यात वाद असतील. पण चित्रपटात जी कारणं दाखवण्यात आली आहे. ती खटकणारी आहे. अफजल खानाला बकरी दाखवून आणल्यासारखं दाखवलंय. बाजीप्रभूंनी मंदिरं बांधली हे दाखवणं तितकं सोपं नाही.
तसेच चित्रपट प्रदर्शनापूर्वी वंशजांना, ऐतिहासिक माहिती असलेल्यांना दाखवला पाहिजे होता. पण तसे झाले नाही. या पत्रकार परिषदेत अमर देशपांडे, किरण देशपांडे, महेश देशपांडे, राहूल दिघे, राजेंद्र देशपांडे हे सर्व उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
Ketki Chitale : टिकेनंतर चिडली केतकी; म्हणाली, सनातनी मुलांनो सुधरा नाहीतर मुली अब्दूलसोबतच दिसतील
हायकोर्टाचा अॅमेझॉनला मोठा दणका, पाकिस्तानमध्ये बनवलेला ‘हा’ पदार्थ भारतात विकण्यास बंदी
जर तुझा बाप सुषमा अंधारेचा पती नसता तर तर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर बोलावलं असतं का?