लोकप्रिय दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज आता एका कारमुळे चर्चेत आली आहे. बजाज कंपनीने Qute ही कार तयार केली आहे. Qute ही भारतातील सर्वात स्वस्त कार आहे, असा दावा या कारची निर्मिती करणाऱ्या बजाज कंपनीने केला आहे. ही कार क्वाड्रिसायकल आहे, जी कारसारखी दिसते. कारसारखी दिसणारी Qute ही बजाज ऑटोने बनवली आहे.(bajaj-qute-car-price-2-50-lakhs-indias-reasonable-car)
त्यात ऑटो रिक्षाच्या बरोबरीचे 216cc इंजिन आहे. हे 13.1 PS कमाल पॉवर आणि 18.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड 70 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, ती सीएनजीवर चालताना 1 किलोमध्ये 50 किलोमीटर मायलेज देते. ही कार पेट्रोलवर 34 किमी मायलेज देते.
एलपीजीवर ही कार लीटरमध्ये 21 किमी मायलेज देते. Qute पूर्वी RE60 म्हणून ओळखली जात होते. Qute ची लांबी 2.7 मीटर आहे. यात सामानासाठी 20 लीटर फ्रंट स्टोरेज आहे. या कारमध्ये छतावर रॅक बसवून स्टोरेज क्षमता वाढवता येते. या कारमध्ये चालकासह ४ लोक बसू शकतात. या कारची किंमत महाराष्ट्रात 2.48 लाख रुपयांपासून सुरू होते.
त्यामुळे ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. क्वाड्रिसायकल ही हलक्या वाहनांची नवीन श्रेणी आहे. चारचाकी वाहनाला सामान्यतः क्वाड्रिसायकल म्हणतात. पण क्वाड्रिसायकल कारपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणून ती स्वतंत्र श्रेणी म्हणून ओळखली जाते. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन Qute कारची रचना करण्यात आली आहे.
ही कार सामान्य ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यांचे एकत्रित केलेलं व्हर्जन आहे. ही कार सामान्य ऑटो रिक्षापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुरक्षित आहे. Qute कार ही सर्व हवामानात सुरक्षितता प्रदान करते. सहसा ही व्यवस्था सार्वजनिक वाहतूक प्रणालीमध्ये वापरले जाते. पण एबीएस आणि एअरबॅगच्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त आणि इतर काही अटींसह सरकारने वैयक्तिक वाहन म्हणून वापरण्याची परवानगी दिली आहे.
या कारची सर्व ठिकाणी चर्चा होत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कार विकत घेताना खूप विचार करत आहे. पण ही कार सीएनजी आणि एलपीजीवर देखील चालते. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होते. Qute ही कार ग्राहकांना मोठी फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नवनीत राणांची जीभ घसरली! ‘मला विचारुन लफडे केले का तुम्ही?’, ऑडिओ क्लीप व्हायरल
मोदींना कोण देऊ शकतं टक्कर? पुढचा पंतप्रधान कोण होणार? जनतेने घेतलं ‘या’ नेत्याचं नाव
“नागपूरात महिलांचा नग्न डान्स, ठाकरे सरकारने सर्व लाजशरम वेशीवर टांगलीय का?”