पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यवसायिक डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाकडून मोफा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता डीएसकेंना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bail granted to famous builder DSK in Pune)
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ठेविदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. डीएसके अनेक दिवसांपासून जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी त्यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
२०१६ तल्या एका प्रकरणात त्यांच्यावर मोफा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेण्यात आली. परंतु फ्लॅटचा ताबा त्यांना दिलाच नाही, त्यांची फसवणूक केली. अशी तक्रार एफआयआरमध्ये होती.
डीएसकेंना या प्रकरणासंदर्भात २०१९ ला अटक झाली, परंतु ते आधीच एका गुन्ह्याअंतर्गत २०१८ पासूनच जेलमध्ये होते. डी एस कुलकर्णी यांच्या यांच्या विरोधात ४०० हून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या असल्यामुळे त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर होतो की नाही. याबाबत शंका व्यक्त केली जात होती.
डीएसकेंचे वकील अशितोष श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे की, डीएसके आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर असलेल्या बहुतेक गुन्ह्यांसाठीची शिक्षा अर्धी भोगली आहे. मुख्य एफआयआरमधील डी एस कुलकर्णी यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल आहे. त्यावर २६ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे.
डी एस कुलकर्णी हे पुण्यासह महाराष्ट्रभरात आणि परदेशातही स्वस्त घरे सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले, त्यानंतर डीएसके यांची कंपनी आर्थिक डबघाईला आली होती. आणि या व्यवहारांसंदर्भात डीएसकेंच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याने डीएसकेंना अटक झाली.
महत्वाच्या बातम्या-
TMKOC: तारक मेहतामधील ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, नवरदेवाचे नाव वाचून आश्चर्य वाटेल
President: राष्ट्पतींची ताकद किती असते? त्यांना शपथ कोण देतं? वाचा पगारापासून ते सर्व सुखसोयींबद्दल…
Supriya Sule: बंडखोरीमुळे सत्ता गेली शिवसेनेची पण टेंशन वाढले सुप्रिया सुळेंचे, जाणून घ्या संपुर्ण समिकरण