पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्येनंतर पंजाबी गायक मनकीरत औलखनेही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पोलिसांनी सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनकीरतला काही वेळापूर्वी एका गँगने जीवे मारण्याची धमकी दिली होती.(badnam-fem-mankirat-aulakh-threatens-to-kill-after-sidhu-musewalas-assassination)
मनकिरत औलखने अनेक पंजाबी गाणी गायली आहेत, ज्यात ‘भाभी’, ‘बदनाम’ पासूनची अनेक गाणी आहेत आणि तो चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे लक्षात घेण्यासारखे आहे की, एक दिवसापूर्वी मूसेवाला मर्डर केसमध्ये मनकिरत औलखचे(Mankirat Aulakh) संबंध असल्याचे सांगितले जात होते. गायकांकडून पैसे उकळण्यामागे मनकिरतचा हात असल्याचे म्हटले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक मनकिरत औलखने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यातच बंबीहा गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे त्याने सांगितले. आता या धमकीबाबत सिंगर यांनी राज्यातील भगवंत मान यांच्या आप सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसून त्यांनी सुरक्षेशी संबंधित बाब गुप्त ठेवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंबीहा गँग(Bambiha Gang) अर्मेनियाच्या तुरुंगात बसलेला गुंड लकी पटियाल चालवतो. त्याचे सहकारी सध्या पंजाबमध्ये आहेत जे वसुलीचे काम करतात. बंबिहा गँगने मुसेवालाची हत्या केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट आली ज्यात त्यांनी दावा केला की मुसेवालाच्या हत्येत मनकिरतचा हात आहे.
मनकिरत औलख हा गँगस्टर लॉरेन्स गँगचा जवळचा असल्याचे बोलले जाते. ही तीच टोळी आहे जिचा गँगस्टार गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला हत्येची जबाबदारी घेतली होती.