प्रसिद्ध टीव्ही शो ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये(Bhabhi ji ghar par hai) मलखानची भूमिका करून लोकांना हसवणारा अभिनेता दीपेश भान यांचं निधन झालं आहे. 11 मे 1981 रोजी जन्मलेल्या दीपेशने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी हे जग सोडले.(bad-news-for-the-fans-of-bhabhi-ji-ghar-par-hai-an-important-actor-of-the-serial)
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना पडला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

क्रिकेट खेळत असताना त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीपेशसोबत(Dipesh bhan) काम करणाऱ्या प्रॉडक्शन टीमचे कर्मचारी सांगतात की, दीपेश खूप निरोगी होता आणि फिटनेसकडे लक्ष देत असे.
अभिनेता दीपेश भान याच्या निधनाची बातमी शोच्या सहाय्यक दिग्दर्शकाने खरी असल्याचे सांगितली आहे. त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच अनेक कलाकार सोशल मीडियावर(social media) त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. दीपेशचा सहकलाकार वैभव माथूरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, होय, तो आता नाही. यावर मला काहीही बोलायचे नाही, कारण सांगण्यासारखं काही उरलेलं नाही.
या दुःखद घटनेनंतर शोचे निर्माते संजय आणि बिनाफर कोहली यांनी संपूर्ण टीमच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात ते म्हणाले, “आमच्या लाडक्या दीपेश भानच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले आणि धक्का बसला. ‘भाबीजी घर पर है’ मधील तो सर्वात समर्पित अभिनेत्यांपैकी एक होता आणि तो आमच्या कुटुंबासारखा होता. सर्वांना त्याची खूप आठवण येईल. त्याच्या कुटुंबीयांप्रती आमच्या हार्दिक संवेदना. त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो. देव त्याच्या कुटुंबियांना हे कधीही भरून न येणारे नुकसान भरून काढण्याची शक्ती देवो.”
टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकनेही(Kavita Kaushik) दीपेशच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहणारी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. कविताने ट्विटरवर मोठी पोस्ट टाकून दिपेशची आठवण काढली. ‘भाबी जी घर पर है’ मधून दीपेशला अधिक ओळख मिळाली असली तरी याआधीही तो अनेक कॉमेडी शोसाठी ओळखला जातो.
त्याने ‘भूतवाला सीरियल’, ‘एफआयआर’, ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’सोबत ‘चॅम्प’ आणि ‘सुन यार चिल मार’ सारख्या शोमध्येही काम केले आहे. यासोबतच तो ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसला होता. तो आमिर खानसोबत एका एड फिल्ममध्येही दिसला होता.