Share

Bacchu Kadu : “त्यांना मंत्रिमंडळात योग्य स्थान न मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालेलं आहे”; भाजप नेत्याचा बच्चू कडूंना टोला

Bacchu Kadu : नुकतीच आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली होती. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गणोजा या गावातील एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले असता त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

गणोजा गावातील रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली होती. यावरून त्याठिकाणी प्रचंड गोंधळ माजला व त्यांनी संतापून तिथे उपस्थित एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. यावर भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडूंना एक सल्लादेखील दिला आहे.

यावेळी बोलताना गोपाल तिरमारे म्हणाले की, चांदूरबाजार तालुक्यातील गणोदा या गावामध्ये काल (बुधवारी) त्या मतदारसंघाचे आमदार बच्चूभाऊ कडू हे एका रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्या कामाच्या संदर्भात स्थानिक उपसरपंच आणि गावकऱ्यांनी बच्चूभाऊ कडू यांना जाब विचारला असता तिथे गावकऱ्यांमध्ये आणि बच्चू कडूंमध्ये वाद निर्माण झाला.

बच्चू कडूंचा राग अनावर झाल्याने त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला एक जोरदार कानशिलात लगावली. त्यांनी स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्त्याला सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जर त्या नेत्यासाठी लोकांमध्ये काम करत असेल, त्या नेत्याचे नाव मोठे होण्यासाठी धडपड करत असेल आणि त्याला त्याच्याच नेत्याने कानशिलात लगावणे ही बाब खूप गंभीर आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. त्यामुळे मी बच्चू भाऊंना विनंती करतो की, आपण आपल्या रागावर थोडे नियंत्रण आणावे, असे ते म्हणाले आहेत

पुढे बोलताना, मला असे वाटते की, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना योग्य स्थान न मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालेलं आहे. त्यामुळे ते त्यांचा राग लोकांवर काढत आहेत, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीदेखील करसगाव येथे रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून लोकांनी त्यांना जाब विचारला असता, त्यांनी तिथल्या एका नागरिकाला नालायक म्हणून संबोधले होते. यावरून तिथे वाद निर्माण झाला होता.

त्यामुळे बच्चूभाऊंना विनंती आहे की, त्यांनी आपला राग अनावर न होऊ देता थोडे संयमाने घ्यावे. जर त्यांची मगरूरी अशीच सुरु राहिली तर भारतीय जनता पक्ष हे खपवून घेणार नाही. कारण, भारतीय जनता पक्ष हा लोकांसाठी काम करत आहे. त्यामुळे त्यांनी जर लोकांवरच अरेरावी करण्याचा प्रयत्न केला तर ते भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही, असे तिरमारे यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
Bachhu kadu : दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती म्हणून, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट
bacchu kadu : अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली; वाचा नेमकं काय घडलंय?
Bachchu Kadu : ‘संजय शिरसाटांची गुवाहाटीच्या तर बच्चू कडूंची सुरतच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन’
bachchu kadu : शिंदेंची डोकेदुखी वाढणार! बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? वाचा नेमकं काय म्हंटलंय बच्चू कडूंनी?

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now