काल शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला झाला. पूर्वीच्या सरकारमधील मोजक्याच लोकांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले. अपक्षांना सुद्धा वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. यामुळे बंडाच्या सुरुवातीपासून शिंदे यांची सोबत करणारे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Bachu Kadu expressed his displeasure)
काल राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यास ते उपस्थित नव्हते. मात्र ते विधानभवन परिसरात आपल्या कार्यालयात काम करत होते. कार्यकर्त्यांच्या समस्यांची पत्रे ते बनवत असल्याचे सांगितले गेले.
बच्चू कडूंना महत्त्वाचे खाते, मोठे मंत्रीपद मिळेल असे सर्वांना वाटत होते. बच्चू कडू यांना पण शिंदेंकडून मोठी अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. चांगले मलाईदार खाते तर दूरच पण मंत्रिमंडळात साधा समावेश पण करण्यात आलेला नाही. यामुळे नाराज असलेल्या बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते.
बच्चू कडू ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री होते. आता तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. ‘मला सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण खाते व अमरावतीचे पालकमंत्रीपद मिळायला हवे,’ असे त्यांनी थेट माध्यमांसमोर बोलूनही दाखवले होते.
बच्चू कडू यांना सामाजिक न्याय, जलसंपदा या खात्यांचे मंत्रिपद हवे होते. पण ती खाती भाजपकडे गेली आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांना त्यापैकी कोणतेच मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. आता पुन्हा एकदा बच्चू कडूंना राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे.
याची कुणकुण बच्चू कडू यांना देखील लागली आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री शिंदे यांना जाऊन भेटले. ठाकरे सरकारमध्ये मिळालेल्या मंत्रीपदावर पाणी सोडून एकनाथ शिंदेंसोबत बच्चू कडू राहिले. त्याच बच्चू कडूंची नाराजी दूर करून त्यांना आपल्यासोबत कशाप्रकारे शिंदे सरकार ठेवेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीत होते तेव्हा बैलगाडीभरून पुरावे देत भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपमध्ये प्रवेश करताच केलं मंत्री
मोदींकडे ना स्वतः च्या मालकीची गाडी, ना शेअर्स; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?
Eknath Shinde : शेवटपर्यंत आमदार संतोष बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते?, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत गुपित सांगितले