Share

मोठी बातमी! आमदार बच्चू कडू भीषण अपघातात गंभीर जखमी; डोक्याला मोठी दुखापत

Bachu Kadu

अमरावती : महाराष्ट्रात आणखी एका आमदाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अमरावतीत अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्याने कडू गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांना उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरावती शहरात सकाळी साडेसहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने कडू यांना धडक दिली.

या धडकेत बच्चू कडू हे रस्त्यावरील दुभाजकावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सकाळी 6.30 च्या दरम्यान घरातून बाहेर पडले होते. अमरावती शहरातील कराडगा रोड परिसरात ते पायी जात असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. थंडी आणि गडद अंधारामुळे काही वेळातच बच्चू कडू खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांच्यावर अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन प्रहार पक्षाने केले आहे.

आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये. अशी विनंती बच्चू कडूंच्या फेसबूक पोस्टमधून करण्यात आली आहे.

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केल्यानंतर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले. सध्या बच्चू कडू यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्यात आले आहे. ते शिंदे-फडणवीस सरकारसोबत असले तरी त्यांची नाराजी वेळोवेळी समोर येते.

आमदाराच्या अपघाताची तिसरी घटना
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील आमदारांच्या अपघाताची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे कार अपघातात गंभीर जखमी झाले होते, तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हेही गेल्या आठवड्यात कार अपघातात गंभीर जखमी झाले होते.

महत्वाच्या बातम्या
बच्चू कडू पुन्हा ठाकरे गटात जाणार, उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही झाली; राज्यातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
प्रसिद्ध टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा अचानक मृत्यू; मृत्यूमागील धक्कादायक कारण आले समोर
jaykumar gore : स्वत: गंभीर जखमी होऊनही आधी चालकाला अन् सचिवाला रुग्णालयात पाठवलं; आमदार गोरेंचा दिलदारपणा

ताज्या बातम्या क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now