Share

बच्चू भाऊंचा ‘प्रहार’, मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत जिंकली, भाजपला भोपळा

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांना मोठा धक्का बसला आहे. संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने १२ जागा जिंकल्या असून काँग्रेसला ४ तर शिवसेनेला फक्त १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, “आम्ही फार कमी जागा लढविल्या आहेत. पण आम्हाला ७५ टक्के यश मिळाले आहे. दहा-वीस वर्षापूर्वी झालेली पक्ष बांधणी त्याला आज जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रत्यांनी केलेली मेहनत महत्वाची आहे. आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. आम्ही एकूण कमी जागा लढवल्या, पण निवडणुकीत यश मात्र जास्त मिळाले आहे.”

राजकारण हे जाती-पाती, धर्म, झेंड्यावर होत नाही, आम्हाला ते सिद्ध करुन दाखवायचे आहे की मंदिर-मशिद असे विषय घेऊन उपयोग नाही, आम्ही सेवेचा विषय घेऊन लोकांमध्ये गेलो. त्याला प्रतिसाद मिळत आहे. हा सेवेचा विषय घेऊन आम्ही महाराष्ट्रभर घेऊन जात आहोत”, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

आगामी निवडणुकांबद्दल देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मत व्यक्त केले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, “सेवेचा विषय घेऊन तुम्ही जनतेत गेलो तर यश नक्की मिळते. येत्या जिल्हापरिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या सोबत कोणी आले तर ठिक आहे, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू.” बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री संजय कुंटे यांना देखील मोठा पराभव सहन करावा लागला आहे.

मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने राज्यमंत्री बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला पसंती दर्शवली आहे. संग्रामपूरमध्ये पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

मोताळा नगरपंचातीवर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. या नगरपंचातीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १२ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त एकच जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री संजय कुंटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपला या ठिकाणी खाते सुद्धा उघडता आले नाही.

महत्वाच्या बातम्या :-
प्रत्येक मंदिरात घंटा का असते? घंटेचा आवाज ऐकल्याने आपल्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो?
रिअ‍ॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस
श्रद्धा म्हणून नाही तर मंदिरात असणाऱ्या घंटेमागे आहे वैज्ञानिक कारण, शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now