राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचे विषय बनले आहे.
तर आज त्यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. बच्चू कडू यांच्या आईचे स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबाबत स्व; ता कडू यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. इंदिराबाई यांचे वय 84 वर्षे होते. प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/BacchuKaduOfficial/posts/3313929145507022
फेसबुस पोस्ट करत कडू म्हणतात, ‘माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.’ मातोश्रींच्या पार्थिवावर उद्या रविवार १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तसेच चादुंर तालुक्यातील बेलोरा या गावी सकाळी १० वाजता अंत्यविधी होईल, अशी माहितीही कडु यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी प्रथमच राज्यमंत्री मंडळात शपथ घेतली त्यावेळी मातोश्री इंदिराबाई कडू या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
दरम्यान, शेतकऱ्यांचे लढाऊ नेते आमदार बच्चू कडूंनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी बच्चू कडूंनी आपल्या आईला हाताला धरुन कार्यक्रमला आणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ त्यांनी ट्वीटही केला होता. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!, असं या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ ५ वर्षाच्या गरीब पोराच्या बॅटींगचा फॅन झाला सचिन; खूष होत स्वत: दिली ५ दिवस ट्रेनिंग
महागड्या स्मार्टफोनसाठी कधीच वापरू नका १००-२०० रुपयांची टेम्पर्ड ग्लास, महागात पडेल स्वस्तातली खरेदी
‘१२ वी’च्या पेपरच्या दिवशीच झाला वडिलांचा मृत्यु, पेपर लिहीताना घळाघळा वाहत होते अश्रू
योगी सरकार २.० मध्ये कोण असणार उपमुख्यमंत्री? ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आहेत चर्चेत