Share

न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला आहे पण…, कारावासाची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

bachchu kadu

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांना चांगलेच महागात पडलं आहे. कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. (bachchu kadus first reaction after the court hearing)

त्यानुसार या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला. कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच कारावासासोबत त्यांना 25 हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. तिरमारे यांनी याबाबत 2017 साली तक्रार केली होती.

न्यायालयाच्या सुनावणीनंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक लढवताना २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता, असे बच्चू कडू म्हणाले.

चला तर जाणून घेऊ या नेमकं प्रकरण काय? बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.

आणि याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. मात्र बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा कडू यांनी केला होता.

दरम्यान, त्यावर आता निर्णय आला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
”संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्चा स्थानावर पोहोचले आहेत”
…तो पर्यंत मी लग्न करणार नाही; निवडणूकीपूर्वीच नवज्योत सिद्धूंच्या मुलीची भीमप्रतिज्ञा
किरीट सोमय्या भडकले; “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…”
‘तु आई कधी होणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलरला सामंथाने दिली थेट बाळंतपणाची तारीख, म्हणाली..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now